🌟पुर्णा शहरात भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी...!


🌟महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास लोटला महाजनसागर🌟


पुर्णा (दि.१५ एप्रिल) - भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती महोत्सवाचे आयोजन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती महोत्सव समिती पुर्णाच्या  वतीने अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष भदंत पय्यावंश,कार्याध्यक्ष तथा आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे,स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे,सचिव माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे व जयंती मंडळाचे पदाधिकारी यांच्या संयोजनाखाली जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि.१४ एप्रिल २०२३ केले होते.


यावेळी सकाळच्या सत्रामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी पुर्णेचे तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर रेल्वे स्टेशन परिसरातील ध्वजारोहण रेल्वे हायस्कूलचे प्राचार्य राम धबाले यांच्या हस्ते झाले तर बुद्ध विहार पुर्णा या ठिकाणी बुद्ध विहार समितीचे सचिव ॲड.महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते त्याचप्रमाणे मुख्य बुद्ध विहारांमध्ये भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर महिला मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी समता सैनिक दलाच्यावतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो,भदंत,पय्यावंश,भदंत बोधिधम्मा यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित यांच्या कडून लड्डू वाटप करण्यात आले. यावेळी दैनिक वृत्तरत्न सम्राट द्वारा  प्रकाशित डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव विशेष अंकाचे पत्रकार कैलास बलखंडे यांच्या संयोजनाखाली विमोचन करण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम माजी शाम कदम यांची व जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी महिला मंडळ  भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा आदींची उपस्थिती होती.दुपारी १२.३० जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत पय्यावंश यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होऊन महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्राची सजविलेल्या अश्वरथातून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली.


यावेळी गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले या भव्य मिरवणूकीत शिक्षक बंडू गायकवाड दिग्दर्शित पंचशील नाट्य ग्रूप मधील मुलींच्या लेझीम पथकाने सर्वांचेच लक्ष वेधले यावेळी डि.जे.पथकच्या कर्ण मधुर  भिम व बुद्धं गित संगीतामध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गगनभेदी जय घोषात भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून संगीताच्या लयबद्ध तालावर मिरवणूकीत प्रचंड संख्येने सहभागी तरुणाई थिरकत होती मिरवणुकीच्या मार्गावर नगर परिषद प्रशासन,युवा सामाजिक कार्यकर्ते चद्रमुनी लोखंडे,ज्येष्ठ समाजसेवक महेबुब कुरेशी,युवा सेना पदाधिकारी विद्यानंद तेजबंद,शहिद भगतसिंघ युथ ब्रिगेड महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष कुंदन ठाकूर यांच्या वतीने ठिक ठिकाणी थंड व शुद्ध पेय जलाची व्यवस्था करण्यात आली होती.


यावेळी परभणी लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय बंडू जाधव यांचेही शहराच्या मध्यभागी मिरवणूक आल्यानंतर आगमन झाले खा.जाधव यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले यावेळी जयंती मंडळातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले पुर्णा शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी व आदर्श घेण्यासारखी आहे असे गौरव उद्गगार यावेळी खा.जाधव यांनी काढले मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आली असताना भदंत डॉ उपगुप्त महाथेरो व जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी जगदीश जोगदंड यांनी पत्रकार संघाच्या वतीने भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पय्यावांश यांचे स्वागत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीस हार्दिक शुभेच्छा दिल्या या ठिकाणी स्वयंस्फूर्तपणे मराठा समाज बांधवांच्या वतीने पाणी बॉटल वाटप करण्यात आले सायंकाळी ०७-०० वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळी भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महान आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी वाटचाल करावी असे ते म्हणाले.


यावेळी जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष रिपाई नेते प्रकाश कांबळे सचिव नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैया खंदारे ज्येष्ठ समाज सेवक साहेबराव कदम नगरसेवक एडवोकेट धम्मा जोंधळे एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड मधुकर गायकवाड मुकुंद भोळे रौफ कुरेशी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित,रिपाई नेते यादवराव भवरे, अशोक धबाले पत्रकार विजय बगाटे,कामगार नेते अशोक व्ही कांबळे प्राचार्य केशव जोंधळे प्राध्यापक अशोक कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष एम यु खंदारे शामराव जोगदंड ज्ञानोबा जोंधळे त्याचप्रमाणे अमृतराव मोरे टी झेड कांबळे दिलीप गायकवाड इंजिनीयर पीजी रणवीर लक्ष्मण शिंदे,प्रविण गायकवाड,विरेश कसबे,सुनिल जाधव,शिवाजी थोरात गंगाधर बरबडीकर अनिल पंडित सुनील गायकवाड मुकुंद पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी दैनिक रिपब्लिकन गार्ड द्वारा प्रकाशित केलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष अंकाचं विमोचन करण्यात येऊन ४०० प्रतीचे वाटप करण्यात आले यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत पयावंश भदंत बोधिधम्मा यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले.जयंती मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी जयंती मंडळाचे पदाधिकारी साहेबराव सोनवणे रवी गायकवाड राहुल धबाले मोहन लोखंडे भीमा वाहुळे राजकुमार सूर्यवंशी इंजिनीयर विजय खंडागळे  भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी  किशोर ढाकरगे  उमेश बाराहटे सूरज जोंधळे आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या