🌟महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत पुरुषां करीता जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल अवॉर्ड "सुधारक" सन्मान देणार...!


🌟मा.पालक मंत्री व मा.जिल्हाधिकारी यांच्या हास्ते दिनांक 01 में 2023 रोजी होणार जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण🌟

परभणी : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय परभणी है बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा सर्वागिण विकास साधण्याचे कार्यकरत आहे 8 लोकसंचिलत साधन केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण व शहरी भागात 4000 बचत गटाच्या 47500 महिलांचे संघटन करण्यात आलेले आहे. विविध विकासात्मक योजनांच्या माध्यमातून महिला स्वयं सहायता बचत गटाची स्थापन करण्यात आलेली आहे. माविम मार्फत 7 लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून नवतेजस्वनी महाराष्ट्र ग्रामीण उद््योम विकास प्रकल्प अंतर्गत ग्रामीण भागातील पुरुषा करीता जेंडर सिन्सिटिव्ह रोल मॉडेल अवार्ड "सुधारक" सन्मान देवून गौरविण्यात येणार मा.पालक मंत्री व मा. जिल्हाधिकारी यांच्या हास्ते दिनांक 01 मे 2023 रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. 

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेड़कर या दोन महापुरुषांनी महिलांचे हक्क व अधिकार यासाठी लढ़ा दिला. महिलांना माणूस म्हणून जगण्यासाठीचे हक्क व शिक्षणाची संधी मिळवून देण्यास क्रांतिकारक कार्य केलेले आहे. या दोन महापुरुषांच्या कार्याची प्रसिध्दी जगभर आहे. महात्मा ज्योतीबा फूले यांची दि. 11 एप्रिल 2023 रोजी 19 वी जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेड़कर यांची दि. 14 एप्रिल 2023 रोजी 132 वी जयंती निमित्ताने एप्रिल महिन्यात महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असलेल्या पुरुषांचा जैंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल अवार्ड म्हणून "सुधारक"' सन्मान हा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे महिला सक्षमीकरणाकरिता संवेदनशील व गाव पातळीवर महिलांच्या विकासाकरिता पुढाकार घेत असलेल्या पुरुषांचा सत्कार करण्याचे नियोजित आहे. या उपक्रमाचा मूळ हेतू म्हणजे नवतेजस्विनी महाराष্्ट्र ग्रामीण उदयम विकास प्रकल्पांतर्गत गाव स्तरावर Men Gender Sensitive Roll तयार होणे व महिला सक्षमीकरणाकरिता पुरक वातावरण तयार करणे आहे. सदर उपक्रम तीन स्तरावरून करण्यात येणार आहे यामध्ये प्रथम स्तर म्हणजे गाव स्तरावरून पात्र पुरुषांची निवड करून त्यांचे नामनिर्देंशन तालुकास्तरावर अंतिम निवडीसाठी पाठविण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातून तीन नामनिर्देशन जिल्हास्तरावर अंतिम निवडीसाठी पाठ्वण्यात येईल जिल्हास्तरावर तीन पात्र पुरुषांची जैंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल अवॉँ्ड "सुधारक" सन्मानकरिता अंतिम निवड करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिये करीता ग्रामस्तर तालुका स्तर व जिल्हास्तर अशा समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. ग्रामस्तरावरील समितीत पोलीस पाटील,अंगणवाड़ी सेविका, ग्रामसंघ/ग्रामसंस्था अध्यक्ष व सहयोगिनी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तालुकास्तरीय समितीत मा.तहसिलदार, मा. गट विकास अधिकारी, मा. पोलिस इन्सर्पेक्टर, मा. एकात्मक बाल विकास प्रकल्प अधिकारी व सिएमआरसी व्यवस्थापक यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय समितीत मा.जिल्हाधिकारी, मा. जिल्हा नियोजन अधिकारी, मा.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा स्तरीय महिला समिती सदस्य जिल्हा समन्वय अधिकारी यांचा समावेश राहिल.निवड प्रक्रिये करीता सुधारक सन्मान पुरुषाची निवड़ करण्या करीता ग्रमस्तर, तालु का स्तरा व जिल्हास्तरावरील निवडीचे खालील निकष आहेत. प्रथम स्तर - गाव स्तर

घर दोघांचे अभियांनातर्गत किंवा स्वतःहुन त्यांच्या शेतीच्या सातबारावर किंवा घरावर किंवा दोन्हीवर ही पत्नीचे नाव आहे लावलेली असेल. महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलत असलेले असतील, महिला सक्षमीकरण व गाव विकासावर काम करण्याची व यासाठी वेळ देण्याची तयारी असेल.घर दोघांचे अभियांनांतर्गत घरावर पती व पत्नीच्या नावाची पाटीकोणत्याही राजकीय पक्षात पदाधिकारी नसावा, तसेच गावातील लोकांना त्यांच्याबद्दल कोणतेही पुर्वग्रह नसावेत

मावीमच्या बचत गटातील सदस्यांच्या कुट्रबातील असतील.

सामाजिक क्षेत्रात सक्रीय सहभाग असावा.महिलांसमवेत आदरपूर्वक वर्तणूक असावीकोणत्याही प्रकारचा कायदेशीर गुन्हा दाखल नसावा. एका मुलीवर अॅपरेशन केलेले असेल. बाल विवाह. हंडा लिंग चिकीत्सा घरगुती हिंसा या सारखया प्रशनांमध्येहस्तक्षेप केला असल्यास.नाविन्यपुर्ण उपक्रम काही केला असल्यास त्याचा उल्लेख करावा.उपरोक्त निकषांच्या अाधारे प्रत्येक गावातुन सहयोगिनींव्दारे/("RP व्दारा नॉमिनेशन घेणे व त्यातून उपरोक्त 12 निकषापैकी कोणत्याही किमान ()४ निकष ज्यांना लागू होतात अशांची गाव समितीने 3 समितीने 3 पुरुषांची निवड अंतिम करावी दवितीय स्तर -तालुका  स्तर महिला हक्क समर्थनात काम केले असावे.असलेले स्त्रियाविषयक काम करणाच्या विविध संस्था संघटनाशी समन्वय स्वतःच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे तालुका स्तरावर उपक्रमात सहभाग असावा. 9) सामाजिक कार्यरत सक्रिय असावा - किमान ३ वर्ष

तुतीय स्तर - जिल्हा स्तर महिला सक्षमीकरणाकरीता नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतलेला असावा. ज्यामध्ये महिला सक्षमीकरण बाबत सकारात्मक प्रभाव दर्शविणारा असावा. (उदा: मुलीला उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात पाठविण्यासाठी निर्णय घेणे. पत्नीला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. महिलांना घराबाहेर पडण्यास व स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन देणारे, स्वतः च्या आयुष्यात संवेदनशिलतेने कुट्ंबातील महिलांशी व्यवहार असणारे) समाजात नवीन उदाहरण ठेवण्यास नेहमीच अग्रेसर राहणारे व्यक्ती. समाजसेवेत सक्रिय असणे - किमान ५ वर्ष वरील निकषाच्या माध्यमातून महिलाच्या सवागिण विकासा करीता उल्लेखनीय कारमगिरी करणान्या पुरुषांचा सन्मान होणार आहे. तालुका स्तरावर माविम कार्यरत गावातील प्रति गाव 1 पुरुषाचा यामध्ये सन्मान करण्याचे नियोजित आहेत तसेच जिल्हास्तरावर 7 लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून कार्यरत गावातील 3 पुरुषांचा सन्मान 1 में 2023 रोजी मा. पालक मंत्री व मा.जिल्हाधिकारी यांच्या हास्ते करण्यात येणार......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या