🌟जिंतूर तालुक्यातल्या बोरी तलावातील वृक्ष तोड तात्काळ थांबवा....!


🌟आदर्श बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन चौधरी यांची मागणी🌟

जिंतूळ प्रतिनिधी  /  बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील गाव तलाव क्षेत्रात वृक्ष लागवड केलेल्या वड व पिंपळ या झाडांची सौर ऊर्जा कंपनी कडून होणारी कत्तल व तोड थांबवावी, अशी मागणी तहसीलदार, जिंतूर व सामाजिक वनीकरण परिक्षेत्र,जिंतूर यांच्याकडे आदर्श बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन चौधरी यांनी केली आहे.


जिंतूर तालुक्यातील बोरी येथील आदर्श बहुउद्देशीय प्रतिष्ठान व पतंजली परिवार च्या वतीने सन २०१६-१७ मध्ये गावा जवळील महसूल विभागाच्या तलाव क्षेत्रात लोक सहभागातून वड व पिंपळ या वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली होती. सलग तीन वर्ष या वृक्ष रोपांचे संगोपन व संवर्धन केल्यानंतर सध्या ही झाडे वीस ते पंचवीस फुटांची झाली आहेत. काही महिन्यापूर्वी सौर ऊर्जा कंपनीकडून पर्यायी व्यवस्था असतानाही जाणीवपूर्वक या झाडांच्या वरून विद्युत तारा नेल्या. हे काम करत असताना सौर ऊर्जा कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी काही झाडांची कत्तल केली तसेच अशा प्रकारचा गैरप्रकार सध्या देखील चालू आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. आदर्श संस्थेचे अध्यक्ष गजानन चौधरी यांनी दि १९ एप्रिल रोजी याबाबत तहसीलदार, जिंतूर व सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, जिंतूर यांना निवेदन दिले. या निवेदनात झाडांची बेकायदेशीररित्या विनापरवानगी होत असलेली कत्तल व तोड करू नये, असा आदेश संबंधित सौर ऊर्जा कंपनीला द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या