🌟परभणी महानगर पालिकेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांकडून जोरदार आंदोलन....!


🌟आंबेडकरवादी संघटनांनी मनपा आयुक्त सांडभोर यांच्या कार्यपध्दतीचा नोंदवला निषेध🌟

परभणी (दि.03 एप्रिल) : महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यपध्दतीच्या निषेधार्थ आंबेडकरवादी व पुरोगामी संघटनांच्या वतीने आज सोमवार दि.03 एप्रिल 2023 रोजी परभणीत जोरदार आंदोलन करीत तीव्र रोष व्यक्त केला.

               या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, कॉमे्रड राजन क्षिरसागर, मिलींद सावंत, किरण घोंगडे, धम्मदिप रोडे, राजकुमार सुर्यवंशी, अर्जुन पंडीत, शरद चव्हाण, सिध्दार्थ भराडे, प्रितम वाकळे, सुधीर साळवे, विश्‍वजीत वाघमारे, सतिश भिसे, आशिष वाकोडे, प्रदिप वावळे, द्वारकाबाई गंडले, महेंद्र गाडेकर, चंद्रकांत लहाने, सिध्दार्थ कसारे, निलेश डुमने, संजय खिल्लारे, प्रविण गायकवाड, गौतम खिल्लारे, अमोल वाघमारे, गौतम भराडे, अक्षय पैठणे, व्यंकट भोसले, अमोल घाळे, अभिषित कदम, बुध्दभूषण हत्तीअंबीरे, कपील गवळी, सुर्यकांत रायबोले, यशवंत खाडे, राहुल मकरंद, सुरेश काळे, रवि खंदारे, संतोष गायकवाड, महेंद्र दांडगे, सुदाम तुमसमिंदर, तुषार कांबळे, चंद्रमुनी थोरात, शाहीर चंद्रकांत दुधमल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते. आदींचा सहभाग होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासह मिरवणूकीत अडथळे निर्माण झाल्यास त्यास मनपा आयुक्त जबाबदार राहतील, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

              महानगरपालिका प्रशासनाने 2018 ला झालेला ठराव पाच वर्षानंतर अंमलात आणला. झिरो होल्डींगचा ठराव जाणिवपुर्वक 01 मार्च पासून कार्यान्वीत केला, असा आरोप करीत ज्येष्ठ नेते वाकोडे यांनी त्यातून आंबेडकर जयंतीसाठी लावले जाणारे होल्डींग यावर जबरी कर आकारणी, तसेच जयंतीचे कोणतेही बॅनर, झेंडे, फलक लावले असता ते काढण्याचे आदेश चूकीचे आहेत, असे म्हटले. मनपा प्रशासनाने घरकुल योजनेतील मागासवर्गीय लाभार्थ्यांची अडवणूक करुन हजारों लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच 2014 चा फेरीवाले, हातगाडे वाले यांच्यासाठी कायदा केलेला असतांनाही राजगोपालाचारी उद्यानातील फेरीवाले व हातगाडेवाले यांना जाणिवपूर्वक हाकालण्यात आले आहे. अशा हुकुमशाही प्रवृत्तीच्या मनपा आयुक्ताविरुद्ध शासनाने कार्यवाही करावी व लोकशाही महोत्सवास गालबोट लागणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी असा इशारा देण्यात आला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या