🌟परभणी शहरातील कपडा व्यापार्‍याला भामट्याने गंडवले २ लाख १० हजार रुपयांना....!


🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातच घडला फसवणूकीचा प्रकार : पोलिस प्रशासनाकडून भामट्याचा शोध सुरू🌟

परभणी (दि.२७ एप्रिल) : परभणी शहरातील कापड व्यापारी कैलास तुलसानी यांना आज गुरुवार दि.२७ एप्रिल २०२३ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गोयल यांच्या नावाचा वापर करीत एका भामट्याने विश्‍वासात घेवून चक्क २ लाख १० हजार रुपयांना गंडवल्याची घटना घडल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. 

या घटने नंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय गाठून या प्रकरणात सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासणीचे काम युध्द पातळीवर करीत त्या भामट्याची छबी सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून कैद केल्याची माहिती हाती आली आहे शहरातील मध्यवस्तीत शगून कलेक्शन नामक कापड दुकान आहे आज गुरुवार दि.२७ एप्रिल रोजी दुपारी या दुकानात एक व्यक्ती दाखल झाला. त्याने दुकान मालक कैलास तुलसानी यांना आपण जिल्हाधिकारी गोयल यांचे पीए आहोत. कर्मचार्‍यांकरीता काही कपडे घ्यावयाचे आहे, सॅम्पल दाखवा असे म्हटल्यानंतर तुलसानी यांनी दोन सॅम्पल देवून त्या व्यक्तीबरोबर नोकरास जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले भामट्याने त्या नोकरासह जिल्हाधिकारी कार्यालयात येवून अधिकार्‍यांच्या दालनात ये-जा केली. त्याने पुन्हा शगून कलेक्शन गाठून, जिल्हाधिकार्‍यांना कपडे पसंत पडले आहेत ४५ ड्रेस लागतील, असे म्हटले. त्या कपड्यांचे ९० हजार रुपयांचे बील झाले तेव्हा दोन हजारांच्या नोटा आहेत, पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये चिल्लर हवी आहे, तुम्ही पाचशें रूपयांच्या नोटांची चिल्लर सोबत घेवून या असे म्हणून त्याने तुलसानी यांच्या समवेतच पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्या ठिकाणी त्या भामट्याने अधिकार्‍यांच्या दालनात ये-जा केली. तुलसानी यांचा विश्‍वास संपादन केला. अन् त्यांच्या जवळील दोन लाख दहा हजार रुपये ताब्यात घेतले. पाठोपाठ मोठ्या थाटा-माटात मोबाईलवर बोलण्याचे नाटक करीत संबंधित भामटा तुलसानी यांना काही कळण्या अगोदरच तेथून पसार झाला जेव्हा तुलसानी यांनी आसपासच्या अधिकार्‍यांच्या कक्षातून, कार्यालयातून फेरफटका मारत त्या व्यक्तीचा शोध सुरु केला तेव्हा तो भामटा आढळलाच नाही. तुलसानी यांनी तात्काळ पोलिसांना माहिती कळविली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या