🌟माणसातले दोष दूर करण्यासाठी माउलींनी पसायदान मागितले - चैतन्यमहाराज देगलूकर


🌟आज पसायदान या प्रवचनमालेच्या दुसऱ्या दिवशी देगलूकर महाराज बोलत होते🌟

सेलू (दि.07 एप्रिल) - सध्या कलियुगात माणसात अनेक दोष असतात,काही गोष्टी नकळत घडतात तर काही गरज म्हणून घडतात परंतु प्रत्येक माणसातील दोष दूर करण्यासाठी ज्ञानेश्वर माउलींनी पसायदान मागितले असा मौलिक संदेश आपल्या प्रवचनातून आज ह.भ.प.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी श्रोत्यांना दिला.

आज पसायदान या प्रवचनमालेच्या दुसऱ्या दिवशी देगलूकर महाराज बोलत होते.सुरुवातीला संतपूजन करण्यात आले.यावेळी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, प्रवचनकार ह.भ.प.योगेश महाराज साळेगावकर,माजी सभापती तथा जी.प.सदस्य अशोकराव काकडे,उद्योजक नंदकिशोर बाहेती,जयप्रकाश बिहानी,वासुदेवराव थोरात,जगताप महाराज आदींसह मान्यवरांनी संतपूजन केले.

पुढे बोलतांना चैतन्यमहाराज देगलूकर म्हणाले की,ज्ञानेश्वरी ही माणसाला देव माणूस बनवते.माणसातले दोष दूर करण्यासाठी ज्ञानेश्वर माउलींनी पसायदान मागितले.हे पसायदान केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर अखिल विश्वाच्या रक्षणासाठी केलेली वैश्विक प्रार्थना आहे.पसायदानात माऊलींचा हेतू हाच आहे की,दृष्टांचा नाश करणे नसून दृष्टांना सज्जन बनवण्याची मागणी पसायदानातून केली आहे.पाप करणे ही माणसाची इच्छा नसते पण नकळत ते होत.त्याची अनेक कारणे असतात.पापाची अनेक कारणे असतात त्यापैकी अज्ञान, प्रमाद,सदोष प्रारब्ध हे दोष देखील पापला कारणीभूत असू शकतात.यासाठीच माउलींनी पसायदानातून दुरितांचे तिमिर( पाप )जावो अशी प्रार्थना केली आहे.यावेळी असंख्य भाविकांनी या प्रवाचनाचा लाभ घेतला.पसायदानाने प्रवाचनाची सांगता झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले.भाविकांच्या स्वागतासाठी आयोजक उद्योजक महेश खारकर,ऍड.उमेश खारकर,प्रसाद खारकर,संजय धारासुरकर,किशोर खारकर, योगेश खारकर,माजी प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी,विनोद मोगल तसेच वसंत प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या