🌟पुर्णा बस स्थानकाच्या इमारतीचे भुत बंगल्यात रुपांतर : मनुष्यरुपी भुतांसाठी झाले स्थळ सुरक्षित अन् सुंदर.....!


🌟कोट्यावधी रुपयांची जमीन संपत्ती इमारत उध्वस्त : इमारतीत नशेडी तळीरामांसह जुगारड्यांचे मुक्त वास्तव्य🌟


पुर्णा (दि.०१ एप्रिल) - महाराष्ट्र राज्यात सन १९९४/९९ या कालावधीत शिवसेना-भाजपाची सत्ता असतांना तत्कालीन महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री व परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष स्व.गिरीष बापट यांनी पुर्णा शहरात मिनी बसस्थानकाला मंजूरी देऊन शहरातील सर्वे नंबर १४ या गायरान जमिनीतील २ हेक्टर १० आर अर्थात ०५ एक्कर १० गुंठे एवडा मोठा भुखंड आरक्षित करून त्या भुखंडावर त्यावेळी लाखों रुपयांच्या शासकीय निधीतून बसस्थानकाची इमारत उभारण्यात आली होती.  


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पुर्णा शहरातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालया समोरील भुखंडावर उभारलेल्या मिनी बसस्थानकाच्या इमारतीचे उदघाटन दि.१० जुन १९९९ रोजी तत्कालीन परिवहन महामंडळाचे अध्यक्ष गिरीष बापट याःच्या हस्ते तत्कालीन आमदार ॲड.तुकाराम रेंगे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते सदरील इमारतीच्या उदघाटनानंतरचा काही काळ वगळता या इमारतीचा वापर परिवहन मंडळाकडून यत्किंचितही झाला नसल्याचे निदर्शनास येत असून या इमारतीचे दरवाजे खिडक्या पंखे आदींसह अन्य फर्निचर चोरट्यांनी कधीचेच गायब केल्याचे दिसत असून या इमारतीसह आतील फर्निचरच्या सुरक्षा व्यवस्थेची जवाबदारी परिवहन मंडळाच्या बेजवाबदार अधिकारी/कर्मचाऱ्यांनी तेव्हाच झटकून दिल्यामुळे सुसज्ज अश्या या पुर्णा मिनी बसस्थानकाच्या इमारतीचे अवघ्या दोन दशकाच्या कालावधीतच भुत बंगल्यात रुपांतर झाल्याचे पाहावयास मिळत असून या बसस्थानका अंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला कुठल्याही सुखसुविधांसह मुबलक प्रमाणात बसेस ही उपलब्ध नसल्यामुळे तब्बल ९९ गाव खेड्यांचा समावेश असलेल्या पुर्णा तालुक्यातील सर्वसामान्य प्रवासी वर्गाला खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या अवैध प्रवासी वाहनांतून आपला जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

 पुर्णा बसस्थानकाच्या ओस पडलेल्या या भुत बंगला सदृष्य इमारतीसह व परिसराचा वापर आता रात्रंदिवस मनुष्यरुपी भुत घेत असल्याचे दिसत असून या बसस्थानकाच्या इमारतीत मद्यपी तळीराम दारू ढोसतांना जुगारडे जुगार खेळतांना गंजेटी गांजा ओढतांना गुन्हेगारी प्रवृत्ती लपतांना सर्रास पाहावयास मिळत आहेत तर शहरातील खाजगी रुग्नालयांतील डॉक्टर या परिसरात बायोवेस्ट मेडिकल जैविक कचरा फेकण्यासाठी करीत असल्यामुळे परिवहन महामंडळाकडून चालवल्या जाणाऱ्या एक/दोन बसगाड्यांतील प्रवासी वर्गासह आसपासचे व्यापारी/रहिवासी यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या