🌟जिंतूर बाजार समिती निवडणूकीसाठी झाले 97.78 टक्के मतदान....!


🌟या निवडणुकीसाठी एकूण 18 जागेसाठी 30 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या 18 जागेसाठी शुक्रवार 28 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 च्या दरम्यानच्या मतदानाच्या टप्प्यात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. एकूण 97.78 टक्के एवढे लक्षणीय मतदान झाले आहे.

या निवडणुकीसाठी एकूण 18 जागेसाठी 30 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर एकूण मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अंतिम 4 वाजेपर्यंत 97.59 टक्के एवढे मतदान झाले होते.

यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघ एकूण मतदान 598 पैकी 576, ग्रामपंचायत मतदारसंघ एकूण मतदान 849 पैकी 941 व्यापारी मतदारसंघ एकूण 64 पैकी 60. हमा मापाडी एकूण 27 पैकी 27 असे एकूण 1 हजार 558 पैकी हजार 501 एवढे मतदान झाले.शनिवार 29 एक वाजता जिंतूर तहसील कार्यालयाचा असून विजयी  दुपार पर्यंत स्पष्ट होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या