🌟सोनपेठ शहरातील केंद्रीय कन्या शाळेमध्ये मानव विकास अंतर्गत 34 सायकलचे मुलींना वाटप....!


🌟यावेळी गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण,केंद्र प्रमुख गनपत कोटलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 


सोनपेठ (प्रतिनिधी) :- सोनपेठ शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेमध्ये शासनाच्या मानव विकास अंतर्गत 34 सायकलचे इयत्ता 8 वी च्या मुलींना वाटप करण्यात आले या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी हे होते तर प्रमुख पाहुणे सोनपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड तसेच प्रमुख उपस्थिती शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ.वंदनाताई नवनाथ शिंदे,सौ.मंगलताई समाधान गायकवाड, प्रकाश दगडु शिंदे, मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड सर्व शिक्षक शिक्षिका आदिंच्या उपस्थितीत इयत्ता 8 वी च्या 34 मुलींना शासनाच्या मानव विकास अंतर्गत सायकल चे वाटप करण्यात आले.

 यावेळी गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण,केंद्र प्रमुख गनपत कोटलवार यांच्या मार्गदर्शनात शासनाच्या मानव विकास अंतर्गत इयत्ता 8 वी च्या मुलींना सायकल चे वाटप करण्यात आले, याप्रसंगी जिल्हा परिषद केंद्रीय कन्या केंद्र प्रशिक्षण चालू होते त्या सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी इयत्ता 8 वी च्या मुलींना शुभेच्छा व्यक्त केल्या.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी यांनी सर्व मुलींना शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच पुढील शिक्षणासाठी आपन आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेची आठवण ठेवून चांगले नाव कराल अशी अपेक्षा व्यक्त केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या