🌟परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमिनीचे मुल्य 234.91 लक्ष रूपये अदा....!

🌟234.91 लक्ष रूपये उद्योग विभाग-मराठवाडा विकास महामंडळ, औरंगाबाद यांना पुस्तकी समायोजनाने अदा🌟 

परभणी (दि.5 एप्रिल) : परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरीता 20 हेक्टर जमिनीचे रेडीरेकनर मूल्य 234.91 लक्ष रूपये उद्योग विभाग-मराठवाडा विकास महामंडळ, औरंगाबाद यांना पुस्तकी समायोजनाने अदा करण्यास शासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे.  

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे उपसचिव अजित सासूलकर यांनी त्या अनुषंगाने 28 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित केला असून परभणी येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयाकरिता उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत मराठवाडा विकास महामंडळ यांची दुय्यम कंपनी परभणी कृषी गो संवर्धन मर्यादित यांच्या नावे असलेली ब्राम्हणगाव, (ता.परभणी) येथील गट क्र. 309 मधील 8.42 हेक्टर आर व गट क्र. 155 मधील 7.75 हेक्टर आर आणि ब्रम्हपूरी तर्फे लोहगाव (ता.परभणी) येथील गट क्र. 02 मधील 3. 83 हेक्टर आर अशी वापरास योग्य असलेल्या एकूण 20 हे. आर. इतक्या जमिनीचे रेडीरेकनर मूल्य रु. 234.91 लक्ष इतकी रक्कम उद्योग विभाग, मराठवाडा विकास महामंडळ, औरंगाबाद यांना पुस्तकी समायोजनाने अदा करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात आली आहे, असे नमूद केले.

दरम्यान, या प्रकल्पासाठी प्रस्तावित 52.06 हे. आर. जमिनीऐवजी 20 हे. आर. जमीन उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी परभणीच्या जिल्हाधिकार्‍यांनी केली होती. त्या अनुषंगाने प्रस्तावित 20 हे. आर. जागेच्या हस्तांतरणाबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व उद्योग विभाग यांच्यामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांच्या अनुषंगाने या विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 5 डिसेंबर 2022 रोजी बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार प्रस्तावित जमीनीचे रेडीरेकनर मूल्य 234.91 लक्ष इतकी रक्कम पुस्तकी समायोजनाद्वारे उद्योग विभागास अदा करण्यासाठी उद्योग विभाग व वित्त विभागाद्वारे सहमती दर्शविण्यात आली होती. त्याअनुषंगाने परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरीता जमिनीचे रेडीरेकनर मूल्य 234.91 लक्ष इतकी रक्कम मराठवाडा विकास महामंडळ, औरंगाबाद यांना पुस्तकी समायोजनाने अदा करण्यास शासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे. 

दरम्यान यासाठी माजी आमदार अँड.विजय गव्हाणे,सचिव बलदेवसिंह,डाँ. हर्षदिप कांबळे, उपसचिव डाँ. दीपक म्है सेकर यांनी पाठपुरावा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या