🌟परळी नगर परिषदेसमोर नगर परिषद कर्मचाऱ्यांचे 12 एप्रिल रोजी भव्य धरणे आंदोलन....!


🌟अशी माहिती राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे परळी शाखाध्यक्ष प्रशांत जगतकर यांनी दिली🌟             

परळी (दि.१० एप्रिल) - परळी नगरपरिषदेसमोर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे 12 एप्रिल रोजी भव्य धरणे आंदोलन करणारा असल्याची माहिती राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे परळी शाखाध्यक्ष प्रशांत जगतकर यांनी दिली आहे.       

याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी नगरपालिकेने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग चा दुसरा हप्ता; महागाई भत्ता फरकाची रक्कम; डी.सी.पि.एस खाते क्रमांक देण्यात यावा तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण व थकीत बिले देण्यात यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्याकरिता सर्व कर्मचाऱ्यास दहा हजार फेस्टिवल देण्यात यावा तसेच 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी डी सीपीएस खाते क्रमांक देण्यात यावा महागाई भत्त्याची सर्व फरकाची थकीत रक्कम देण्यात यावी. निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत दिले तात्काळ देण्यात यावे .व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवण्यात यावी सातव्या वेतन आयोगाच्या दुसरा हप्ता देऊन रमजान ईद साजरा करण्यात यावा.तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला निवृत्त झालेल्या पदावर परत करारनाम्यावर घेण्यात येऊ नये त्या जागी त्या पदाच्या शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या कर्मचाऱ्यास त्या पदावर संधी देण्यात यावी या व इतर मागण्याची लेखी निवेदन संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना दिनांक 23 /3 /20 23./ 16 /2 /2023  6/ 4/ 2023. इत्यादी वेळा लेखी निवेदने देऊनही कुठल्याच प्रकारची कारवाई न  झाल्यामुळे सदरील कर्मचारी हे दिनांक बारा चार 2023 बुधवार रोजी परळी नगर परिषदेसमोर भव्य धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे परळी शाखाध्यक्ष प्रशांत जगतकर यांनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या