🌟वारकऱ्यांनो तयारीला लागा : संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे 10 जूनला प्रस्थान.....!


🌟पालखीच्या मुक्कामांची, विसाव्याची माहिती देहू देवस्थानकडून जाहीर करण्यात आली आहे🌟

⭕पाहा वेळापत्रक.....

पुणे (दि.०९ एप्रिल) – राज्यभरातील पांडुरंगाचे निस्सीम भक्त वारकरी ज्या वेळेची वाट पाहत असतात ती वेळ आता जवळ येत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून 10 जून 2023 ला तीर्थक्षेत्र देहू येथून तुकोबारायांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यावर्षी 29 जून 2023ला देवशयनी आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे.दरम्यान, वारी सोहळ्यातील पालखीच्या मुक्कामांची, विसाव्याची माहिती देहू देवस्थानकडून जाहीर करण्यात आली आहे. 

यंदाचे वर्ष हे तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे 338वे आहे. 10 जून 2023 ला प्रस्थान झाल्यानंतर दरमजल करत सोहळा 28 जून 2023ला पंढरपूरात पोहोचणार आहे. एकूण 19 दिवसांचा हा प्रवास असेल. पालखी 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे अशी माहिती, पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी दिली आहे.

⭕पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

जेष्ठ वद्य सप्तमी शनिवारदि.10 जून 2023ला पालखी प्रस्थान दुपारी 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे.

रविवार 11 जून 2023 ला पालखी सकाळी 10.30 वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल.सोमवार 12 जून2023 ला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल.मंगळवार 13 जून 2023 ला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल.बुधवार 14 जून 2023लोणीकाळभोर,गुरूवार 15 जून 2023 ला यवत, शुक्रवार 16 जून 2023 वरवंड, शनिवार 17 जून 2023उंडवडी गवळ्याची,रविवार 18 जुन 2023 बारामती, सोमवार 19 जून 2023सणसर, मंगळवार 20 जून 2023आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण व मुक्काम, बुधवार 21 जून 2023 निमगाव केतकी,गुरूवार 22 जून 2023इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, शुक्रवार 23 जून 2023सराटी, शनिवार 24 जून 2023रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण आणि रात्रीचा मुक्काम अकलुज येथे होईल.

रविवार 25 जून 2023रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल व रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. सोमवार 26 जून 2023रोजी सकाळी धावा व रात्री पालखी मुक्काम पिराची कुरोली येथे होईल मंगळवार 27 जून 2023रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व रात्री वाखरी येथे मुक्काम होईल बुधवार दि.28 जून 2023रोजी पालखी वाखरी वरून पंढरपूरात दाखल होतील दुपारी उभे रिंगण होईल व त्यानंतर पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिर,नवीन इमारत येथे होईल. 

बुधवार 29 जून 2023रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान(मंदिर) येथे मुक्कामी असेल गुरूवार दि. 29 जून 2023ते सोमवार दि. 3 जुलै 2023 रोजी दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या (मंदिर) नवीन इमारतीमध्ये पंढरपूर येथे असणार आहे.3 जुलैला 2023दुपारी काला झाल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरूवात करेल. पालखी परत येताना १० दिवसांचा प्रवास करून 13 जुलै 2023 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहू येथे विसावेल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या