🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे श्री.भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन....!


🌟या कार्यक्रमाला गाव परिसरातील भाविक भक्ताचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद🌟


पुर्णा (दि.२६ मार्च) - पुर्णा तालुक्यातील मौ.धनगर टाकळी येथे दि.२३ मार्च २०२३ पासून भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याला सुरुवात झाली असून या भागवत कथेमध्ये सकाळी ०६-०० पासून ते १०-०० वाजेपर्यंत पारायण तर दुपारी १२-०० पासून ते ०४-०० पर्यंत भागवत कथा,०४-०० पासून ते सायंकाळी ०७-०० वाजेपर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम आणि रात्री ०९-०० पासून ११-०० वाजेपर्यंत किर्तन सोहळ्याचे कार्यक्रम अश्या प्रकारे दैनंदिन कार्यक्रम आयोजित केले आहेत. 

या कार्यक्रमाला गाव परिसरातील भाविक भक्ताचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आणि उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वच कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची आणि पंच क्रोशीतील भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळत आहे.गावकऱ्याच्या वतीने आव्हान करण्यात येतं आहे कि सर्वांनी या भागवत कथेसाठी आणि किर्तणाचा लाभ घ्यावा असे आव्हान समस्त गावकरी मंडळी आणि राम मंदिर व्यवस्थापन समिती धनगर टाकळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या