🌟परभणी जिल्ह्यातील केशरी शिधा पत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रोख रक्कम - जिल्हाधिकारी आंचल गोयल


🌟दर महिन्याला आता अन्नधान्याऐवजी प्रति व्यक्ती दिडशे रुपये रोख रक्कम जमा होणार🌟

परभणी (दि.31 मार्च) :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत परभणीसह राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतक-यांच्या खात्यावर जानेवारीपासून दर महिन्याला आता अन्नधान्याऐवजी प्रति व्यक्ती दिडशे रुपये रोख रक्कम जमा होणार असल्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.  

          यापूर्वी केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे दर महिन्याला प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य (दोन रुपये प्रति किलो गहू व तीन रुपये प्रति किलो तांदूळ) या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. तथापि भारतीय अन्न महामंडळाकडून गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट खात्यावर जमा होणारआहे. सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यात मार्चअखेर एपीएल शेतकरी कार्डधारक 49 हजार 981 असून 2 लाख 18 हजार 904 इतके लाभार्थी आहेत. 

जिल्ह्यातील शेतकरी योजनेच्या लाभासाठी आरसीएमएसवर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिका धारकांनी डीबीटीसाठी आवश्यक असलेला बँक खात्याचा विहीत नमुन्यातील फॉर्म संबंधीत तहसिल कार्यालय (पुरवठा विभाग) येथून मिळवावा. तसेच सदर फॉर्म ऑफलाईन भरुन अर्जासोबत महिला कुटूंब प्रमुखाच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशनकार्डच्या पहिल्या पानाची प्रत, सर्व सदस्यांच्या आधारकार्डची प्रत व विहीत नमुन्यातील फॉर्म संबंधित स्वस्तधान्य दुकानदार यांच्याकडे तात्काळ जमा करावेत. कुटूंबातील काही सदस्य मयत व मुलींचे लग्न होऊन कायम स्थलांतर झाले असल्यास दुकानदारांना ही नावे वगळण्यास कळवावे व फॉर्मवर एकूण सदस्य संख्या लिहून फॉर्म जमा करावा.

या योजनेंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पात्र शिधापत्रिकाधारक महिला कुटुंब प्रमुखाचे कोणत्याही बँकेत खाते नसल्यास महिलांनी नवीन बँक खाते सुरु करावे. लाभार्थ्यांनी तो फॉर्म व आवश्यक बँक खाते व कागदपत्रे मुदतीत संबंधित स्वस्तधान्य दुकानदार कार्यालयात जमा न केल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. परभणी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ आवश्यक कागदपत्रे संबंधित स्वस्तधान्य दुकानदाराकडे जमा.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या