🌟परभणीचे ‘प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्याकडून इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्राची तपासणी....!


🌟या परीक्षा केंद्र तपासणी दरम्यान जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक कैलास मठपती उपस्थित होते🌟

परभणी (दि.०२ मार्च) :  जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या सुरु झाल्या असून, मराठवाडा हायस्कूल, शिवाजीनगर आणि गांधी विद्यालय, कृषि सारथी कॉलनीसह विविध शाळांमधील परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत सुरु असल्याची प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी आज तपासणी केली.             इयत्ता दहावीची परीक्षा जिल्ह्यातील विविध शाळांमधील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येत असून, ही परीक्षा २ ते २५ मार्चदरम्यान होत आहे. या परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांनी कॉपी करु नये, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथक, बैठी पथकांसह मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानांतर्गंत सर्व परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षेत गैरप्रकार घडू नये म्हणून विभागात महसूलची १०, शिक्षण विभागाची सहा तसेच ३३ बैठी पथके स्थापन करण्यात आली असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर तीन जणांचा पथकात समावेश आहे. या परीक्षा केंद्र तपासणी दरम्यान जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक कैलास मठपती उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या