🌟पुर्णेत ॲनर्जी ड्रिंकच्या नावावर विक्री होणाऱ्या न्यु स्टिंग ॲनर्जीचा सर्वत्र धुमाकूळ.....!


🌟शाळकरी विद्यार्थी/विद्यार्थीनी महिला ही ॲनर्जी ड्रिंकच्या विळख्यात : बॉटलवर लिहिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष🌟  

✍🏻शोध आणि बोध :- चौधरी दिनेश (रणजीत)

पुर्णा (दि.२८ मार्च) - उन्हाळ्याची सुरुवात होताच देशी बनावटीच्या लस्सी,मठ्ठा,आईस्क्रीम व दुधापासून तयार झालेल्या अन्य शितपेयांसह उसाचा रस,फळांपासून तयार करण्यात येणारे ज्युस अर्थात (फळांचा रस) याकडे सपसेल दुर्लक्ष करून ॲनर्जी ड्रिंकच्या नावावर विकल्या जाणाऱ्या बॉटलबंद कोल्ड ड्रिकचे सेवन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अश्या कोल्ड ड्रिकच्या सेवनामुळे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात याचे देखील कोल्ड ड्रिंक सेवन करणाऱ्यांना भान राहिले नसल्याचे निदर्शनास येत आहे.


उन्हाळ्याला सुरुवात होताच कोल्ड ड्रिक हाऊस,किराना दुकान,स्विटमार्ट,मेडिकल स्टोअर्सवर बॉटलबंद शितपेय (कोल्ड ड्रिक) यात थंम्सअप,स्पारिट,कोकोकोला,स्टिंग,फंन्टा,मिरींडा,कैपा कोला,माझा,सेवनअप,लिमका,माऊंटेन ड्यू या मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या केमीकल/रसायनयुक्त शितपेयांच्या विक्रीला सुरुवात होत असते यावेळी मात्र या कोल्ड ड्रिंक मध्ये आणखी एका बॉटलबंद शितपेयाची वाढ झाली असून ॲनर्जी ड्रिंकच्या नावावर विक्री होणारे न्यु स्टिंग ॲनर्जी २५० मिली या प्रमाणात उपलब्ध असून या ॲनर्जी ड्रिंक मध्ये अल्कोहोलचे प्रमाण शुन्य टक्के जरी असले तरी या एका २५० मिलीच्या बॉटल मध्ये कैफीनचे प्रमाण ७२ मिलीसह ॲस्युलफ्लेम पोटेशियम व सुक्रालोज देखील असल्यामुळे या ड्रिंकचे अतिसेवन केल्यामुळे याचे मानवी शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात तसा सावधानतेचा इशारा देखील या न्यु स्टिंग ॲनर्जी ड्रिंकच्या बॉटलवरील लेबलवर देण्यात आलेला असून लहान मुल,गर्भवती महिला,स्तनदा मातांनी या ॲनर्जी ड्रिंकचे सेवन करणे टाळायलाच हवे असेही नमूद केलेले असून या ॲनर्जी ड्रिंकचे सेवन दिवसातून केवळ ५०० मिलीच करायला हवे असेही नमूद करण्यात आले आहे.

स्टिंग एनर्जी हे पेप्सिको इंटरनॅशनलचे कार्बोनेटेड एनर्जी ड्रिंक आहे आणि रॉकस्टार इंक द्वारे उत्पादित केले आहे स्टिंग मूळ गोल्ड रश, गोल्ड,पॉवर पॅक,पॉवर लाइम आणि बेरी ब्लास्ट सारख्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे यात २५० मिलीच्या प्रती बॉटल मध्ये ७२ मिली कैफीन असून हे मानवी शरिरास घातक असते त्यामुळे ही ड्रिंक केंद्रीय मज्जासंस्थाला उत्तेजन देते त्यामुळे त्या व्यक्तीला सावध आणि उत्साही वाटत असले तरी यामुळे कधीकधी पोटात अम्ल सोडण्यास वाढते यामुळे वेदना किंवा अस्वस्थ पोटाचा त्रास होतो हे एक मूत्रपिंड आहे. कॅफिन (Caffeine) शरीरातील कॅल्शियम च्या शोषणामध्ये व्यत्यय आणू शकते असे असतांना देखील शहरासह संपूर्ण तालुक्यात या न्यु स्टिंग ॲनर्जी ड्रिंकची प्रचंड प्रमाणात खरेदी/विक्री होत असल्याचे निदर्शनास येत असून शाळकरी विद्यार्थी विद्यार्थीनी महिला अबालवृध्द या ड्रिंकच्या आहारी गेल्याचे निदर्शनास येत असून या स्टिंग ॲनर्जी ड्रिंकचे आठ वर्षाच्या मुलांपासून महिला वयोवृध्द देखील मोठ्या प्रमाणात सेवन करतांना पाहावयास मिळत असून शहरासह तालुक्यातील किराणा,दुकान पानटपऱ्या,हॉटेल्स,स्विट मार्ट कोल्ड ड्रिंक सेंटर तसेच शाळा/महाविद्यालयांच्या परिसरात देखील या ड्रिंकची मोठ्या प्रमाणात विक्री होतांना पाहावयास मिळत असून लहान मुल देखील या स्टिंग ॲनर्जी ड्रिंकच्या आहारी गेल्यामुळे पालकांनी वेळीच सावध झालेल बर नसता एक दिवस पालकवर्ग आपल मोठ नुकसान करुन घेतील स्वतःच.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या