🌟पुर्णा तहसिलचे नुतन तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या पुढे गौण खनिज माफीयाशाहीचे मोठे आव्हाण.....!


🌟शासकीय गौण खनिज अवैध उत्खननासह चोरटी वाहतूक रोखण्यात तहसिलदार बोथीकर यांना यश येईल काय ?🌟

पुर्णा (दि.१५ मार्च) - पुर्णा तालुक्याच्या तहसिलदार पल्लवी टेमकर यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागेवर आलेले नवनियुक्त तहसिलदार माधवराव बोथीकर यांनी नुकताच पदभार स्विकारला असून तहसिलदार श्री.बोथीकर यांच्या पुढे गौण खनिज रेती/मुरुम/दगड खडीसह माती आदी गौण खनिज माफीयाशाहीचे मोठे आव्हान असून या माफीयाशाहीचा विमोड करीत शासकीय गौण खनिज रेतीचे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध उत्खननासह प्रचंड प्रमाणात होणारी चोरटी वाहतुक रोखण्याच्या दृष्टीने ते कठोर पाऊल उचलून या बेलगाम माफीयाशाहीला अंकुश लावतात की हिरवा कंदील दाखवतात हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे.

पुर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या पुर्णा-गोदावरी नदीतील शासकीय गौण-खनिज रेतीचे प्रचंड प्रमाणात होणारे अवैध उत्खननासह चोरटी वाहतूक चोखण्यात महसुल प्रशासनासह पुर्व तहसिलदार टेमकर यांना अपयश आले होते त्यामुळे पुर्णा-गोदावरी नद्यांवर अक्षरशः असंख्य रेती तस्करांच्या टोळ्या तुटून पडल्या होत्या त्यामुळे पुर्णा-गोदावरी नद्यांची पात्र अक्षरशः कोरडीठक्क पडली याचा सर्वात जास्त परिणाम कृषी उद्योगावर पडला यास सर्वस्वी महसुल प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यच जवाबदार असल्याचे नदीकाठांवरील शेतकरी वर्गातून बोलल्या जाते.

पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतील रेतीसह शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसुल बुडवून बिना परवाना चालणाऱ्या दगड खदान खडी क्रशर चालकांवर देखील तहसिलदार श्री.बोथीकर यांना लक्ष केंद्रित करुन शासनाच्या महसुलात वाढ करावी लागणार आहे कारण मागील वर्षी १६ डिसेंबर २०२२ रोजी पुर्णा तालुक्यातील तब्बल १४ खडीक्रशर व दगडखानपट्टे सिल करण्याचे नाट्य रंगवून दि.१९ डिसेंबर २०२२ जिल्हा खनिकर्म अधिकारी परभणी यांना गौण खनिजाच्या अनाधिकृत उत्खननासह दगडखानपट्टे/दगडगिट्टी मोजनी करीता ड्रोन उपलब्ध करुन देण्याची लेखी पत्र क्र.जा.क्र.२२२/गौण खनिज/कावी या पत्राद्वारे मागणी केली परंतु प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई न करता संबंधित खडीक्रशर व दगडखानपट्टे धारकांना पाठीशी घालण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला होता परंतु या प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली हे अद्यापही गुलदस्त्यातच असून संबंधित  खडीक्रशर व दगडखानपट्टे आज देखील पुर्वी प्रमाणेच सुरू असल्याचे निदर्शनास येत असून संबंधित खडीक्रशर व दगडखानपट्यांवर एकतर कायदेशीर कारवाई करणे किंवा त्यांना अधिकृत परवाने बहाल करीत त्यांच्याकडून महसुल वसूल करीत शासकीय महसुलात वाढ करण्याच्या आवाहनासह निरंकूश झालेल्या महसुल प्रशासन व पुरवठा विभागाला देखील नियंत्रित करुण शिस्त लावण्याचे आवाहन नुतन तहसिलदार बोथीकर यांच्यापुढे आहे.या संदर्भात नुतन तहसिलदार माधवराव बोथीकर काय निर्णय घेतात हे लवकरच समोर येईल......

परखड सत्य :- चौधरी दिनेश (रणजीत)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या