🌟मुंबई येथे १३ मार्च पासून आयोजित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनात हजारो कर्मचारी होणार सहभागी...!


🌟राज्यातील नियमित आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांवर कंत्राटी आरोग्य सेविका यांना समाविष्ट करण्याची मागणी🌟


परभणी : राज्यातील कंत्राटी आरोग्य सेविका यांच्या न्यायिक हक्काच्या विविध मागण्यांसाठी आयटक कडून उद्या १३ मार्च २०२३ रोजी मुंबई येथे धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून या धरणे आंदोलना नंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दि.१५ मार्च २०२३ रोजी कंत्राटी आरोग्य सेविकांच्या वतीने काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असल्यामुळे आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईत आयोजित कंत्राटी आरोग्य सेविकांच्या धरणे आंदोलनात परभणी जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य सेविका देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.आयटक सलग्न आरोग्य खाते कंत्राटी परिचारीका युनियन राज्य शाखा यांची बैठक दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली यावेळी नियमित आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांवर कंत्राटी आरोग्य सेविका यांना समाविष्ट करावे,इतर राज्यांप्रमाणे समान काम समान वेतन लागू करावे,नुकत्याच घोषित अर्थसंकल्पात अंगनवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली त्याच प्रमाणे कंत्राटी आरोग्य सेविका कर्मचाऱ्यांच्या वेतनात देखील वाढ करावी,राज्यात ३२०७ कंत्राटी कर्मचारी असून १६०० आरोग्य सेविका आहेत जवळपास ६ हजार पद रिक्त असतांना ती शासनाकडून भरली जात नाहीत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त पदांवर समायोजन करावे असे सांगितले असतांना अद्याप समायोजन झाले नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल कंत्राटी आरोग्य सेविकांच्या मागण्या मान्य न झाल्यास दि.१३ मार्च रोजीधरणे आंदोलन करण्याचा इशारा आरोग्य सेविकांनी दिला होता या धरणे आंदोलनात परभणी जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य सेविका देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या