🌟सरकारच्या विरोधातील संपकऱ्यांचे अंदोलन जिंतूर तहसीलच्या प्रांगनातच....!


🌟तालुक्यातील सुमारे 727 कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग🌟

जिंतूर प्रतीनीधी / बि.डी.रामपूरकर

सामान्य आंदोलकांना मोर्चेकऱ्यान तहसील आवाराच्या बाहेर तर आंदोलक संपकरी आत कसे असा प्रश्न जिंतूर येथे उपस्थित झाला असून सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस होता गेल्या दोन दिवसापासून तहसील कार्यालयाच्या प्रांगणातच कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले असून सर्वसामान्य नागरिकांना अंदोलनासाठी मात्र आत येऊ दिले जात नाही. सामान्यांना एक तर कर्मचाऱ्यांना एक न्याय कसा असा प्रश्न सर्व सामान्यात विचारला जात आहे 


जिंतूर तालुक्यातील सुमारे 727 कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला असून या संपाच्या आज तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात पाहणी केली असता कर्मचाऱ्यापेक्षा त्यांची वाहन असलेल्या मोटरसायकली मोठ्या प्रमाणात दिसून आल्या तर तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये कर्मचाऱ्यांचा आंदोलन खुलेआमपणे सुरू असल्याचे चित्र  जिंतूर तहसील प्रांगणात दिसून आले आहे 

एरवी सर्व सामान्य जनतेला अथवा नागरिकांना आंदोलन करायचा असेल मोर्चा उपोषण करायचा असेल तर तहसील कार्यालयाच्या गेट बाहेरच अडवल्या जाते त्यांना बाहेरच आपले आंदोलन करा आत जाऊ दिले जात नाही तर अनेक वेळा कडक पोलीस बंदोबस्त ही त्या ठिकाणी ठेवल्या जातो परंतु शासनाच्या विरोधात  चालत असलेल्या या आंदोलनाचे ठिकाण मात्र तहसील कार्यालयाचे प्रांगन कसे ? असा खोचक सवाल सर्वसामान्य नागरिक उघडपणे करताना दिसून येत आहेत.  याबाबत तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना आंदोलकांनी प्रांगणामध्येच आंदोलन करत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली असता त्यांनी कार्यवाही बाबत वरिष्ठानकडून मार्गदर्शन घेतले जाईल असे म्हटले आहे . तहसीलदार काय कार्यवाही करतील या कडे सर्व सामान्यांचे लक्ष लागले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या