🌟जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी सज्ज.....!


🌟भाजप तर्फे व्यापारी राजू देवकर व रमण तोष्णीवाल यांची उमेदवारी जाहीर🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी  भाजप कडून आज व्यापारी मतदार संघासाठी दोन उमेदवार जाहीर करण्यात आले कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी चालु झाली असून आज जिंतूर शहरातील. व्यापाऱ्यांची बैठक घेऊन भारतीय जनता पार्टी कडून व्यापारी  मतदार संघात आज राजू देवकर आणि रमन तोष्णीवाल  यांचे नाव गंगाधर बोर्डीकर यांनी जाहीर केले.

या वेळी शहरातील अनेक व्यापारी बांधव उपस्थित होते तर व्यासपीठावर भाजप ता. अध्यक्ष लक्ष्मण दादा बुधवंत, भाजपा जिल्हा उपा. प्रदिप कोकडवार ,वसंतराव शिदे, सचिन गोरे, कृष्णा देशमुख यांच्या सह अनेक व्यापारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या