🌟नांदेड-पुर्णा-परभणी लोहमार्गा वरून धावणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी असुरक्षित....!


🌟नांदेड स्थानकावरील तपोवन एक्सप्रेस रेल्वेतील शौचालयात आढळला एका अनोळखी ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह🌟


नांदेड (दि.२४ मार्च) - नांदेड-पुर्णा-परभणी लोहमार्गावरून धावणाऱ्या एक्सप्रेस-पेसेंजन प्रवासी रेल्वे गाड्यांतून प्रवास करणाऱ्या तसेच या रेल्वे स्थाककांवरून रेल्वेत प्रवासासाठी आलेल्या महिला प्रवासी अत्यंत असुरक्षित असल्याचे निदर्शनास येत असून काल गुरुवार दि.२३ मार्च २०२३ रोजी नांदेड रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या तपोवन एक्सप्रेस मधील शौचालयात एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

 नांदेड येथून मुंबई येथे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसची दि.२३ मार्च २०२३ रोजी नांदेड रेल्वे स्थानकावर साफसफाई करण्यात येत होती यावेळी सफाई कर्मचाऱ्याला रेल्वे डब्यातील शौचालयात एक महिला मृत अवस्थेत आढळून आली त्यानंतर रेल्वे पोलिसांना घटना कळल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला सदरील महिलेच्या अंगावर जखमा दिसून आल्याने या महिलेचा खून झालेला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे याप्रकरणी सध्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे हे करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या