🌟सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी....!


🌟जिंतूर येथे ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय’ महारोजगार मेळाव्याचे रविवारी दि.१२ मार्च २०२३ रोजी आयोजन🌟

 परभणी (दि.०३ मार्च) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व दिपस्तंभ प्रतिष्ठान, जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी जिंतूर येथे ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय’ महारोजगार मेळाव्याचे रविवारी दि.१२ मार्च २०२३ रोजी सकाळी ०९-३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. 

            बोर्डीकर पोदार इंटरनॅशनल स्कूल, जिंतूर येथे आयोजित मेळाव्यात विविध नामांकित उद्योजक, कंपन्या सहभाग नोंदविणार असून ३३०० पेक्षा जास्त पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन तिथेच नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत -जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे विभागाकडून करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ०२४५२२२००७४ अथवा ९८६००१५३८३, ९६२३०२०९३४, ९८९०८२८७९७ या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील उमेदवारांनी https://jobfair.mysba.globalsapio.com/ येथे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या