🌟जुनी पेन्शन साठी कर्मचाऱ्यांचा मानोरा तहसील कार्यालयावर धडकला पेन्शन मोर्चा....!



🌟कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा सातवा दिवस🌟

फुलचंद भगत

मंगरुळपीर :- दिनांक ०१ नोंव्हेंबर २००५ नंतर शासकिय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणी व इतर मागण्यांसाठी दिनांक १४ मार्च २०२३पासुन शासकिय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे .या संपात आपल्या वाशिम जिल्ह्यातील सर्व विभागांचे कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.संपाच्या आजच्या सातव्या दिवशी मानोरा तहसील कार्यालयावर कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालय ते तहसील कार्यालय मानोरा असा भव्य पेन्शन मोर्चा काढण्यात आला.एकच मिशन जुनी पेन्शन,#vote for ops,"जो देईल पेन्शन त्याला देऊ समर्थन" सारख्या घोषणा देत कर्मचाऱ्यांचा शासनविरोधात संताप दिसुन आला.

महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय दिसुन आला.मानोरा तालुका समन्वय समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढल्यानंतर बेमुदत संप सुरूच राहणार असल्याची माहिती समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांची एकजुट झाली असुन कर्मचाऱ्यांच्या आक्रोशाची शासनाने दखल घ्यावी अन्यथा भविष्यात या पेक्षाही तीव्र स्वरूपाचे मोर्चे,आंदोलने काढुन शासनविरोधात आक्रमक होणार असलेल्या भावना मोर्चेकऱ्यांनी बोलून दाखविली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या