🌟प्रहार जनशक्ती पक्ष परभणीची महिला आघाडी व 'युवा आघाडीची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त....!


🌟लवकरच प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी जिल्हा कार्यकारणीची बैठक होऊन नवीन कार्यकारीनी जाहीर होणार🌟

परभणी (दि.२० मार्च) :- प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने तसेच मा. बल्लूभाऊ जवंजाळ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व मा. प्रविणभाऊ हेंडवे जिल्हा संपर्क प्रमुख परभणी यांच्या सुचनेनुसार पदाचा कार्यकाळ संपलेल्या प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी व प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडी या दोन्ही आघाड्यांची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.

या बरखास्त करण्यात आलेल्या कार्यकारणीत प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी व प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडीच्या दोन्ही जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख व विभाग प्रमुख ही सर्व पदे बरखास्त करण्यात आली असून या आघाड्या अंतर्गत सुरू असलेल्या शाखांचे शाखा प्रमुख व शाखा कार्यकारणीचे सर्व पदे कायम ठेवण्यात आली आहेत.

लवकरच प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी जिल्हा कार्यकारणीची बैठक होऊन प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी व प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडी कार्यकारणीची नव्याने नियुक्ती करण्यात येईल तसेच बरखास्त करण्यात आलेल्या पदावरील पदाधिकाऱ्यांनी कुठेही व कुठल्याही परिस्थितीत पक्षाच्या बरखास्त करण्यात आलेल्या पदाचा वापर करू नये असे पक्षाच्या वतीने सुचित करण्यात असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या