🌟पुर्णा तालुक्यातील जागृत पावन तिर्थक्षेत्र श्री.सोमेश्वर गौर येथे यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन...!


🌟सदर कार्यक्रमाचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन सोमेश्वर देवस्थान व गौर गावकऱ्यांनी केले आहे🌟

पुर्णा (दि.२४ मार्च) : पुर्णा तालुक्यातील पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील गौर येथील जागृत पावन तिर्थक्षेत्र श्री.सोमेश्वर देवस्थान यात्रा महोत्सवा निमित्त तारीख ३० मार्च ते ६ एप्रिल २०२३ पर्यंत समस्त गावकऱ्यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ३० मार्च रोजी रामनवमी निमित्त रामजन्मोत्सव व दुपारी ११ वाजता हभप अनंत महाराज हिवरेकर यांचे हरीकिर्तन होईल व त्यानंतर अच्युत संभाजी पारवे यांच्या वतीने दुपारी २ ते ४ पर्यंत महाप्रसाद,तारीख ३१ रोजी श्री संत मोतीराम महाराज यांच्या नेमानिमीत्त रामराव विश्वनाथन पारवे यांचा महाप्रसाद तर रात्री ९ ते ११ हभप माणिक खिल्लारे यांचे हरीकिर्तन होणार आहे.तारीख १ एप्रिल रोजी रात्री ९ ते ११ हभप लक्ष्मण महाराज केडूळकर यांचे हरीकिर्तन तर २ एप्रिल रोजी  सकाळी श्रीची पुजा व आमलीचा कार्यक्रम आणि दुपारी २ वाजता जंगी कुस्त्यांची दंगल,या निमित्ताने विजयी मल्लास प्रथम पारितोषिक १५५५५,द्वितीय १११११ आणि तृतीय पारितोषिक ७७७७ रुपये प्रदान करण्यात येईल.यासाठी आमदार रत्नाकर गुट्टे २१००० रुपये,संतोष भाऊ मुरकुटे ११००० रुपये,विशाल कदम ११००० रुपये, मारोतराव बनसोडे ११ हजार  रुपये, दिगंबर क-हाळे ११ हजार रुपये, श्रीधर पारवे ५००० रुपये, राजू जोगदंड ५००० रुपये या प्रमाणे हे प्रमुख देणगी देणार आहेत.तसेच तारीख ३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता श्रीची पालखी मिरवणूक निघेल या पालखी सोहळ्या निमित्त  रात्री माॅं जिजाऊ संगीत संच पिंपरणवाडी लोहा येथील गायीका यशोदा, राहू जाधव यांच्या विरुद्ध श्रीकृष्ण भक्तीधाम संगीत संघ आव्हई गायीका राधाबाई पांचाळ या दोघांचा सामना रंगणार आहे.तारीख ४ एप्रिल रोजी  सकाळी ६ श्रि ना आरत्या पुजन तर रात्री श्री सोमेश्वर भजनी मंडळाचा हरीजागर आणि ५ एप्रिल रोजी रात्री हनुमान भजनी मंडळाचे भजन तसेच तारीख ६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता महारुद्र अभिषेक आणि नंतर  हनुमान जयंती झाल्यावर महाप्रसाद या प्रमाणे कार्यक्रमाचे श्री सोमेश्वर मंदिर संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन सोमेश्वर देवस्थान व गौर गावकऱ्यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या