🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या.....!


🌟राहुल गांधी म्हणाले मी सावरकर नाही गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाहीत🌟

✍️ मोहन चौकेकर

* भारताच्या नीतु घंघासने रचला इतिहास; महिला बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप: नीतू घनघसने जिंकले गोल्ड मेडल, फायनलमध्ये नीतूने मंगोलियाच्या बॉक्सरचा केला पराभव

* ICICI बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले, ज्येष्ठ नागरिकांसाठी बल्क एफडीवर किमान व्याज दर 4.75 टक्के आणि कमाल व्याज दर 7.25 टक्के असणार

* 2022-23 या आर्थिक वर्षात 95 हजारांपेक्षा अधिक लोकांची यूपीआयद्वारे फसवणुक, गेल्या 3 वर्षांमध्ये फसवणुकीचा आकडा अडीच लाखांहून अधिक

* भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील, पहिला प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे सुरू 

* आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाची स्थापना करण्यात येणार, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही - आदिवासी विकास मंत्री

* लोकसभा सचिवालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी सुप्रीम कोर्टात, लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केल्याप्रकरणी राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात याचिका

* महाड तालुक्यातील सिंचन व जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार; पुनर्वसनाला गती देण्याचे उपमुख्यमंत्र्याचे निर्देश.

* पुन्हा बोहल्यावर चढणार रजनीकांत यांचा जावई: 18 वर्षांचा पहिला संसार मोडल्यानंतर धनुष करणार दुसरे लग्न, होणारी दुसरी पत्नीही विवाहित.

* हळदीमध्ये होत असलेली भेसळ राज्य सरकार रोखणार; लवकरच फलोत्पादन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त बैठक घेणार.

* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेंगळुरूमध्ये नवीन मेट्रो लाईन केली लाँच.

* काँग्रेस पक्षाकडून कर्नाटक विधानसभेसाठी 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

* राहुल गांधी म्हणाले, मी सावरकर नाही, गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाहीत.

* भारताचा २०४७ पर्यंत संपूर्ण विकसित राष्ट्र होण्याचा संकल्प - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

* शिवसेना आमदार सदा सरवणकरांवर गुन्हा : शस्त्र परवानाही रद्द होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

* लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध : राज्यपाल रमेश बैस

* राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावे, सावरकरांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून एकनाथ शिंदेंची टीका

* राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात टीका केली.

* “हिंमत असेल तर ” विधानसभेत कॅगचा अहवाल वाचणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज

* विधानसभेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरील कॅग चौकशी अहवाल वाचून दाखवला.

* एअर इंडियानंतर आता अकासा घेणार उंच भरारी, हजारो हातांना देणार रोजगार

* नवीन एअरलाइन्स Akasa Air देखील उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांनी शेकडो नवीन विमानांची ऑर्डर देण्याबरोबरच कंपनी १,००० जणांची भरतीही करणार आहे.

* “कोणीतरी टाकलेल्या घाणीतूनही” पतीच्या आत्महत्येनंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत मयुरी देशमुखच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे.

* राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर केरळ काँग्रेस वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी सज्ज

* काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर केरळमध्ये काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन यांनी सांगितले की,आम्ही वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी सज्ज आहोत.

* राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कल्याणमध्ये काँग्रेसचा मोर्चा : राहुल गांधी यांची खासदरकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि रद्द केलेली खासदारकी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसतर्फे शनिवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

* भर उन्हाळ्यात संततधार : चंद्रपूर जिल्ह्याला झोडपले शहर तथा जिल्ह्यातील काही भागात दुपारी एक वाजतापासून संततधार पाऊस.

* ‘भीड’ चित्रपटाला वादाचा फटका; प्रेक्षकांनी फिरवली पाठ,अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

* शेतकऱ्यांसाठी डिजीक्लेम अ‍ॅप 6 राज्यांत लाँच: पीक विम्याचा तात्काळ क्लेम करण्याची व क्‍लेमचे पैसे मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार, महाराष्ट्रातही लवकरच सुविधा मिळणार

* जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसविण्यास सुरुवात, वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* वाहनातून होणाऱ्या कोळसा चोरीला आळा बसणार: औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेच्या संदर्भात लवकरच धोरण, राज्य सरकार कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही आणि ट्रॅकिंग सिस्टीम बसवणार

* अमेरीकेतील चक्रीवादळात 23 जणांचा मृत्यू: मिसीसिपी येथे आलेल्या चक्रीवादळात 23 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी; 4 जण बेपत्ता, बचावकार्य सुरू

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर 59840 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर 54850 रुपये.                                            

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या