🌟गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी...!


🌟उपस्थित शेतकऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून आपल्या नुकसानीचा पाढा आ.डॉ.गुट्टे यांच्या समोर वाचला🌟


अवकाळीचा तडाखा बसल्याने झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पूर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून आपल्या नुकसानीचा पाढा आ.डॉ.गुट्टे यांच्या समोर वाचला.  


अवकाळी पावसाचा तडाखा पूर्णा तालुक्यातील आव्हई, बरबडी आणि सुहागण या गावांना बसला आहे. पावसात गारपीटीचा फटका बसल्याने ज्वारी, गहू, ऊस या प्रमुख पिकांसह केळी कांदा, मिरची, शेवगा, खरबूसाचे अतोनात नुकसान झाले आहे. ऊसाच्या नळ्यात आळ्या पडल्या आहेत. तर ज्वारी आणि गहू आडवा पडला आहे. त्यामुळे आ.डॉ.गुट्टे साहेबांनी  सर्व नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

राज्यातलं शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त सर्व भागाची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना सुध्दा शासनाने दिले आहेत. आपल्याही भागांमध्ये झालेलं नुकसान मोठे आहे. त्यामुळे पंचनामे झाल्यानंतर सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करतो. तसेच घाबरू नका, कोणत्याही संकटात मी तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात आमदार डॉक्टर गुट्टे साहेबांनी  उपस्थित शेतकऱ्यांना धीर दिला

यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पूर्णाचे तहसीलदार माधव बोथीकर, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, तालुका अध्यक्ष गणेश कदम, युवा वक्ते संदीप माटेगावकर, जगन्नाथ रेनगडे, सुदाम वाघमारे, सुभाषराव देसाई, नवनाथ भुसारे, शिवाजी आवरगंड, मारुती मोहिते, पशुपती शिराळे, यांच्यासह संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी, सरपंच ग्रामस्थ आणि नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या