🌟जिंतूर सेलू मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते रविवार दि.०५ मार्च रोजी विवीध विकास कामाचे उद्घघाटन....!


🌟जिंतूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी निवासस्थान बांधकामाचा ही समावेश🌟

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी.रामपूरकर

जिंतूर : जिंतूर- सेलू मतदार संघाच्या आमदार सौ मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन रविवार 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे.


यामध्ये जिंतूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी निवासस्थान अंदाजित रक्कम 706.27 लक्ष रुपये, ग्रामीण रुग्णालयातील निवासस्थान बांधकाम अंदाजित रक्कम 432.86 लक्ष रुपये, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय बांधकाम, अंदाजे ते रक्कम 173.88 लक्ष रुपये, शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण, 235.70 लक्ष रुपये, फाळेगाव, सेनगाव जिंतूर परभणी या 248 किमीच्या राज्य महामार्गाच्या काँक्रीट सह रुंदीकरण अंदाजित रक्कम 1500 लक्ष रुपये आदी विकास कामाचे भूमिपूजन जिंतूर- सेलू मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या