🌟पुर्णा तालुक्यातील सुहागन येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी.....!


🌟तालुक्यातील सुहागन येथे गेल्या ५०० वर्षापासून श्रीराम नवमीची परंपरा चालू🌟 

पूर्णा (दि.३१ मार्च) - पुर्णा तालुक्यातील सुहागन येथे काल गुरुवार दि.३० मार्च २०२३ रोजी श्रीराम नवमी निमित्त गावातील महिलांनी आपल्या घराबाहेर सकाळी लवकर ०५-०० वाजता ऊठुन सडा टाकुन रांगोळी काढून परिसर स्वच्छ केला चैत्रशुद्ध नवमी महिन्यातील नवरात्रचा नववा दिवस या दिवशी श्री रामचंद्र प्रभू यांचा जन्म झाला त्यामुळे संपूर्ण भारत देशामध्ये श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात येते. 

तालुक्यातील सुहागन येथे गेल्या ५०० वर्षापासून श्रीराम नवमीची परंपरा चालू असून ह्या वर्षी सुद्धा गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी बळीरामजी गोविंदराव भोसले यांच्या निवासस्थानी रामनवमी निमित्त भोजनासह मंदिरात भजन पूजन किर्तन हभप.उद्धव महाराज भारती राहटीकर यांचे दहा ते बारा किर्तन झाले किर्तन झाल्यानंतर गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात महाप्रसादाचा लाभ घेतला........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या