🌟गंगाखेड तालुक्यातील दामपुरीत वीस मेंढ्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने खळबळ....!


🌟सखाराम बोबडे पडेगावकर यांची घटनास्थळी भेट🌟  

गंगाखेड (दि.१८ मार्च) - अज्ञात आजाराने दामपुरी शिवारात दोन दिवसात तडफडून वीस मेढ्यांचा  मृत्यू झाल्याने मेंढपाळात एकच खळबळ उडाली आहे. सखाराम बोबडे पडेगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन भेट मेंढपाळांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.     

   दामपुरी शिवारात दहा ते बारा मेंढपाळ वेगवेगळ्या कळपाने अनेक वर्षापासून मेंढ्या सांभाळतात. त्यातील विठ्ठलराव बोबडे यांच्या मेंढ्या शिवारात थांबल्या असताना अचानक रात्री काही मेंढ्या ओरडत ,पाय खोडत असल्याच त्याच्या लक्षात आले. पाहता पाहता त्या रात्रीमध्ये आठ ते दहा मेंढ्यांचा  मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी परभणी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना ही माहिती कळविण्यात आली. दुसऱ्या रात्रीही परत काही मेंढ्या अशाच चक्कर येऊन पडू लागल्या. सकाळी आणखी दहा मेंढ्या मृत अवस्थेत आढळून आल्या. ही माहिती आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळताच त्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन मेंढपाळांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरूनच जिल्ह्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ आगाव यांच्याशी संवाद साधत मेंढपाळांच्या अडचणी त्याच्या कानावर घातल्या. मेंढ्यांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी लवकरच एक पथक नेमात उपचार करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.  एका पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृत्यूमेंढ्याच्या शरीराची काही भाग तपासणीसाठी पुणे येथे प्रयोग शाळेला पाठवण्यात आल्याची माहिती दिली. हा रिपोर्ट आल्यानंतरच याचे कारण लक्षात येणार आहे. एकूणच दोन दिवसात सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाल्याने मेंढपाळ विठ्ठल बोबडे व त्यांचे कुटुंबीय भयभीत झालेले आहेत. या मेंढपाळांना शासनाकडून वैद्यकीय मदत व नुकसानी बद्दल आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेउत असे आश्वासन सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या