🌟पुर्णा नगर परिषदे माजी नगरसेवक तथा काँग्रेस नेते सुनिल जाधव यांचा शिवसेना (शिंदे) गटात जाहीर प्रवेश....!


🌟मुंबई येथे मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला जाहीर प्रवेश🌟  


पुर्णा (दि.२८ मार्च) - काँग्रेस पक्षाचे नेते तथा पुर्णा नगर परिषदेचे अभ्यासू माजी नगरसेवक सुनिल लक्ष्मण जाधव यांच्यासह माजी नगरसेवक नटराज कांबळे,माजी नगरसेवक विनोद गायकवाड व बिएसपी नेते अनिल पंडीत,माजी नगरसेवक सुनिल रामभाऊ कांबळे,माजी नगरसेवक अशोक गोपालराव धबाले,यांनी काल सोमवार दि.२७ मार्च २०२३ रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख भाई एकनाथ शिंदे राज्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.


यावेळी मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते माजी नगरसेवक सुनिल जाधव यांच्यासह बिएसपी नेते अनिल पंडीत,माजी नगरसेवक नटराज कांबळे,मा.नगरसेवक सुनिल कांबळे,मा.नगरसेवक अशोक धबाले,मा.नगरसेवक विनोद गायकवाड यांचे धनुष्य बान असलेला भगवा रुमाल गळ्यात घालून स्वागत केले.पुर्णा नगर परिषदेचे आगामी निवडणूकीत त्यांच्या या जाहीर प्रवेशामुळे शिवसेना (शिंदे) गटाला निश्चितच फायदा होणार आहे...टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या