🌟स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार....!


🌟त्यांच्या या नियुक्तीबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक व  कर्मचार्‍यांच्या वतीने त्यांचा  सत्कार करण्यात आला🌟

पुर्णा (दि.१७ मार्च) - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांची नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालय व  माहितीशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे माननीय कुलगुरू यांनी नुकतेच कळविले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक व  कर्मचार्‍यांच्या वतीने त्यांचा  सत्कार करण्यात आला

प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयावर अमेरिका, फ्रांन्स, इंडोनिशिया, व्हियतनाम या देशात  आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर वाचन केले आहे तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक शोधनिबंध  प्रकाशित केले असून त्यांचे आतापर्यंत बारा ग्रंथ प्रसिद्ध आहेत. सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी यशस्वी धुरा सांभाळली आहे.  महाराष्ट्र शासनाच्या विविध समीत्यावरही त्यांनी यशस्वी कार्य केले असून गेली पस्तीस वर्षे ते ग्रंथालय चळवळीत मोलाचे योगदान देत आहेत.  त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय गुलाबराव कदम, इंजिनिअर अविनाश कोठाळे व संचालक मंडळ तसेच श्री. गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयाचे कोषाध्यक्ष  उत्तमराव कदम, सचिव अमृतराज कदम, प्राचार्य डॉ. के. राजकुमार तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी यांनी त्यांचे  अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या