🌟पुर्णेत फाल्गुन पौर्णिमेनिमित्त बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन.....!


🌟सकाळी 05-30 वाजता बुद्ध विहार या ठिकाणी परित्रान पाठ व सूत्र पाठ करण्यात येणार आहे🌟

पूर्ण (दि.06 मार्च) - पुर्णा येथील बुद्ध विहार या ठिकाणी दि.06 मार्च 2023 रोजी फाल्गुन पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन त्याच प्रमाणे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल भीम नगर बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे असून सकाळी 05-30 वाजता बुद्ध विहार या ठिकाणी परित्रान पाठ व सूत्र पाठ करण्यात येईल.

सकाळी 10-30 वाजता सर्वे नंबर 162/ 3 पूर्णा शिवारामध्ये तक्षशिला मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था मर्यादित पूर्णा नाम फलकाचे अनावरण तहसीलदार माननीय पल्लवी टेमकर यांच्या हस्ते होईल भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण होईल.

यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक नामदेवराव राजभोज जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांची असणार आहे दुपारच्या सत्रात बुद्ध विहारात पूजनीय भिक्कू संघास भोजनदान व त्रिरत्न वंदना होईल...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या