🌟परभणी महानगर पालिके समोर रिपब्लिकन सेने कडून निदर्शने....!


🌟राजगोपालाचारी उद्यानासमोरील हातगाडे चालकांसह विक्रेत्यांवरील अन्याय थांबवण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी🌟

परभणी (दि.२० मार्च) :  वसमत रस्त्यावरील राजगोपालाचारी उद्यानासमोरील हातगाडे चालकांसह विक्रेत्यांवरील अन्याय थांबवावा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज सोमवार दि.२० मार्च रोजी महापालिका कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली व उपायुक्तांना घेरावही घातला.

                गेल्या अनेक वर्षांपासून या उद्यानासमोर हातगाडे चालक विक्रेते हे छोट छोटे व्यवसाय करीत उदरनिर्वाह करीत आले आहेत. परंतु, काही दिवसांपासून या विक्रेत्यांना तेथून महापालिका प्रशासनाने हटविले व हातगाडे लावण्यास मज्जाव केला.  त्यामुळे रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली या विक्रेत्यांनी उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांना घेराव घातला व लवकरात लवकर प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी केली.

                या आंदोलनात ज्येष्ठ नेते डी.एन. दाभाडे, रवि सोनकांबळे, सुधीर कांबळे, प्रदिप वाव्हळे, निलेश डुमणे, धीरज कांबळे, कुंडलिक गायकवाड, दिलीप कांबळे, दयानंद भराडे, गजानन सूर्यवंशी, अक्षय डाके अविनाश कांबळे, विकास ससाणे, रईस खान, शेख सरफराज, गौतम धबाले आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या