🌟पुर्णा तालुक्यातील देगाव येथे होणारा बालविवाह प्रशासनाने अखेर रोखला....!


🌟या कारवाई प्रसंगी स्वतः जिल्हा महिला बालविकास अधिकारी के.व्ही.तिडके यांची उपस्थिती🌟 

पुर्णा (दि.१३ मार्च) : पुर्णा तालुक्यातील देगाव येथे आज सोमवार दि.१३ मार्च २०२३ रोजी अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांक १०९८ वर मिळतात जिल्ह्यातील सर्व यंत्रणांच्या समन्वयाने देगाव येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात आला बालविवाह होणाऱ्या मुलीचा वयाची पुर्ण खात्री केल्यानंतरच ही कार्यवाही करण्यात आली. 

या कारवाई प्रसंगी स्वतः जिल्हा महिला बालविकास अधिकारी मा श्री के व्ही तिडके बालविकास प्रकल्प अधिकारी पूर्णा  श्रीमती एम आर काळे, तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीमती सुनिता  वानखेडे  जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे गजानन पटवे, चाईल्ड चे भरत ढगे, पीएसआय श्रीमती राखोंडे  कैलास सत्यार्थी फाऊंडेशन चे लक्षमन गायकवाड, देगाव येथील अंगणवाडी ताई, सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक इत्यादी उपस्थीत होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या