🌟पुर्णा येथील सेवा निवृत्त रेल्वे ड्रायव्हर अब्दुल हबीब साहब यांचे अल्पशः आजाराने दुःखद निधन...!


🌟पुर्णा नगर परिषदेचे मा.उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब यांचे ते वडील होते🌟

पुर्णा (दि.०३ मार्च) - येथील अली नगर येथील जेष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त रेल्वे ड्रायव्हर अब्दुल हबीब साहब यांचे आज शुक्रवार दि.०३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.

अत्यंत मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून परिचित असलेले अब्दुल हबीब साहब हे पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सना उर्दु स्कुल या संस्थेचे अध्यक्ष अब्दुल मुजीब साहब व ॲड.अब्दुल मुजाहीद यांचे वडील होते 

अब्दुल हबीब साहब यांच्या पार्थिव देहावर आज शुक्रवार दि.०३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास पुर्णा येथील मुस्लीम कब्रस्थानात दफनविधी संस्कार पार पडला... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या