🌟देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे - सुषमा अंधारे



🌟गंगाखेडात खासदार-आमदारांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सवानिमित्त व्याख्यान🌟

गंगाखेड (दि.11 मार्च) : केंद्रातील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे सरकार लोकशाही मोडकळीस काढण्याच्या मार्गावर आहेत आणि हळूहळू हुकूमशाहीकडे देशाला नेत आहेत, म्हणून नागरिकांनी जागृत होण्याची गरज आहे. यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी केले. 

             गंगाखेड येथे शुक्रवार दि.10 मार्च 2023 रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित शिवव्याख्यानप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार संजय जाधव तर अध्यक्षस्थानी आमदार डॉ.राहुल पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, रिपाई नेते सिद्धार्थ भालेराव, आयोजक उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटे, शिक्षक सेनेचे राज्य सचिव बाळासाहेब राखे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिथिलेश केंद्रे, रिपाईचे धम्मानंद घोबाळे काँग्रेस युवकचे सरचिटणीस प्रणित खजे, प्राचार्य मुंजाजी चोरघडे, वंचित बहुजन आघाडीचे दिगंबर घोबाळे, तालुकाप्रमुख अनिल सातपुते, पंचायत समिती सदस्य जानकीराम पवार, शहर प्रमुख जितेश गोरे, समाजवादी पार्टीचे शेख उस्मान आदी उपस्थित होते.

            यावेळी खासदार जाधव यांनी आपल्या भाषणातून, जिल्ह्यातील नागरिक ठाकरे कुटुंबांवर प्रेम करतात. परभणी जिल्हा हा शिवप्रेमी बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा आहे. खर्‍या अर्थाने शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देणारा परभणी जिल्हाच आहे म्हणून जिल्ह्यातले नागरिक ठाकरे कुटुंबांवर अजूनही प्रेम करतात. यामुळेच शिवसेनेमध्ये कुठलीही गद्दारी जिल्ह्यात झाली नाही. जिल्हा आजही अभेद्य आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

            यावेळी आ. डॉ.पाटील, गोविंद यादव यांनी विचार मांडले. प्रास्ताविक आयोजक  विष्णू मुरकुटे यांनी केले. सूत्रसंचालन पदुदेव पालमकर तर आभार प्रदर्शन बाळासाहेब राखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा सेनेचे संदीप राठोड, भागवत शिंदे, सिद्धेश्वर आंधळे, स्वप्निल राठोड, सुशील पाळवदे, पांडुरंग पाळवदे, अक्षय आंधळे, सिद्धेश्वर मुरकुटे, धोंडीराम जाधव, इंद्रजीत हाके, परमेश्वर घुले, राजाराम पवार यांच्यासह शिवसेना, युवा सेना, शिक्षक सेनेच्या पदाधिकार्‍यांंनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या