🌟शासकिय सेवेतील नौकर भरती कंत्राटी पध्दतीने न करता शासकिय यंत्रणेमार्फतच करा....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी🌟

परभणी (दि.१७ मार्च) - राज्य राज्यशासनाने नुकताच शासन निर्णय काढून राज्यामध्ये विविध शासकिय पदे यात कुशल व अकुशल नौकर भरतीचाही समावेश आहे ही भरती खाजगी यंत्रणे मार्फत कंत्राटी पध्दतीने भरणेबाबत निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शासकिय नौकरीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी अन्याय कारक आहे तसेच शासकिय सेवेमध्ये असलेले अनेक महत्वाचे पदे ज्यामध्ये गोपनियतेचा व ठरवून दिलेले काम वेळेत करण्याचा कार्यकाळ ठरलेला असतो.

 या महत्वाच्या पदांवर खाजगी कंत्राटदारामार्फत नौकर भरती झाल्यास सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ही यंत्रणा बांधील नसेल, त्यामुळे सामान्य जनतेच्या प्रश्नांवर न्याय मिळण्यासाठी शासनाने ठरवून दिलेला कालावधी खाजगी कंत्राटदार नौकर भरतीतील कर्मचाऱ्यांकडून पाळला जाणार नाही आणि याचा परिणाम जनसामान्यांच्या महत्वाच्या कामकाजावर होईल. त्याशिवाय खाजगी कंत्राटदाराव्दारे होणाऱ्या नौकर भरती विषयी विश्वासार्हता शिल्लक राहणार नाही व शासकीय सेवा बाबत पारदर्शकता राहणार नाही. करिता राज्य शासनाने खाजगी यंत्रणे कडून कंत्राटी पद्धतीने शासकीय नौकर भरती चा जो निर्णय आहे त्या निर्णयाचा पुनर्विचार करून राज्यातील सर्व शासकीय नौकर भरती शासकीय यंत्रणे मार्फत विभागवार घ्यावी या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. महेश वडदकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे यांना देण्यात आले.

राज्यामधील बेरोजगारीचा आकडा पाहता व शासकिय सेवेसाठी तयारी करु पाहणान्या सुशिक्षीत युवकांच्या भविष्याचा विचार करता, त्याच बरोबर शासकिय कामातील पारदर्शकता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पाहता खाजगी कंत्राटदाराव्दारे होणारी शासकिय भरती ही पुर्णतः चुकीची असून राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयावर आपण मुख्यमंत्री या नात्याने पुनर्विचार करावा  असे हि या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, मिडिया प्रभारी नकुल होगे, पिंटू कदम, रामेश्वर पुरी, शेख बशीर, सय्यद युनूस आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या