🌟पुर्णा तालुक्यातील गौर येथील सहशिक्षक संदिप मारोती दुथडे यांचे वयाच्या ३१ व्या वर्षी दुःखद निधन...!
🌟त्यांच्या पच्छात आई,वडिल,भाऊ,बहिणी,काका व काकू असा परिवार आहे🌟

पुर्णा (दि.१८ मार्च)
- पुर्णा तालुक्यातील गौर येथील श्री.सोमेश्वर विद्यालयातील सहशिक्षक संदिप मारोती दुथडे सर यांचे वयाच्या ३१ व्या वर्षी आज शनिवार दि.१८ मार्च २०२३ रोजी सकाळच्या सुमारास दुःखद अपघाती निधन झाले आहे.

गौरसह संपूर्ण पुर्णा तालुक्यात अत्यंत निर्मळ स्वभावाचे मनमिळावू व प्रेमळ व्यक्तीमत्व म्हणून संदिप दुथडे सर हे परिचित होते गौर येथील श्री.सोमेश्वर विद्यालयात ते मॅथ व सायन्स चे उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या पच्छात भाऊ,बहिणी,आई-वडिल, काका-काकू असा मोठा परिवार आहे.
संदिप दुथडे हे पुर्णा सहकारी साखर कारखाना वसमचे माजी संचालक मारोती सहादू दुथडे यांचे सुपूत्र व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी बँक निरिक्षक तथा श्री.सोमेश्वर विद्यालयाचे सदस्य गणपत सहादू दुथडे यांचे पुतणे होत.

त्यांच्या पार्थिवावर आज शनिवार दि.१८ मार्च २०२३ रोजी दुपारी ०४-०० वाजेच्या सुमारास त्यांच्या पुर्णा-नांदेड रोडवरील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या