💥पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज दि.२९ मार्च रोजी तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल...!


💥शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता💥

पूर्णा (दि.२९ मार्च) - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची प्रक्रिया सोमवारपासून तहसील कार्यालयात सुरू झाली असून बुधवार दि.२९ मार्च रोजी तीन  उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे तर ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. 

पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून तहसीलदार माधवराव बोथीकर तर ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू हे काम पाहत आहेत. तर या  निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख दि.०३ एप्रिल अशी असून या निवडणुकीमध्ये पुर्णा तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे तरी शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या