🌟हनुमान वस्ती विनंती बस थांब्याचे सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या हस्ते अनावरण...!


🌟यावेळी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण किसनराव सकनुर, सरपंच रामभाऊ सकनुर यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

गंगाखेड (दि.१० मार्च) - हनुमान वस्ती विनंती बस थांब्याचे  आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.


पालम ते ताडकळस मार्गावर कळगाववाडी गाव आहे. काही शेतकरी ,शेतमजूर मुख्य रोडच्या बाजूलाच बऱ्याच वर्षापासून शेतात वास्तव्यास आहेत. या वस्तीला हनुमान वस्ती हे नाव देण्यात आले.  याठिकाणी ये जा करणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी बस थांबत नव्हती.या ठिकाणी बस थांबण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी या वस्तीवरील ग्रामस्थांनी आम पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडे मांडली.  बोबडे यांनी एसटी परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांच्याकडे ग्रामस्थांची अडचण कळवली.  विभागीय नियंत्रकांनी परभणी आगारप्रमुखांना आदेशित केल्यावर या ठिकाणी बस थांबायला सुरुवात झाली.  रामायणाचार्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली यां नामफलकाचे अनावरन सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण किसनराव सकनुर, सरपंच रामभाऊ सकनुर, दतराव गवते, नामदेव सकणुर ,हनुमान  सकनुर ,सुधाकर सकणुर, बाबाराव सकनूर, रामदास निळे, पांडुरंग सकनुर आदीं सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बस थांबण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सखाराम बोबडे पडेगावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या