🌟पुर्णेकरांचे 'स्वच्छ शहर सुंदर शहराचे' स्वप्न दुभंगले ? नगर परिषदेचा गलथान कारभार देत आहे रोगराईला निमंत्रण.....!


🌟अधिराज्य प्रतिष्ठानने केली घनकचरा व्यवस्थापणाचे टेंन्डर घेतलेल्या जि.एम.कंन्स्ट्रक्शन विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी🌟


पूर्णा (दि.११ मार्च) - पुर्णा शहरातील घनकचरा व्यवस्थापणावर नगर परिषद प्रशासनाकडून कागदोपत्री कोट्यावधींचा खर्च दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र कचरा व्यवस्थापणाच्या नावावर निव्वळ भुलभुलैया कारभार होत असल्यामुळे पुर्णेकरांचे स्वच्छ शहर सुंदर शहराचे स्वप्न दुभंगल्याचे निदर्शनास येत असून शहरात सर्वत्र स्वच्छते अभावी नाल्या तुंबलेल्या दिसत असून जागोजाग कचऱ्याचे अक्षरशः ढिगार साचल्यामुळे नगर परिषद प्रशासन शहरात जाणीवपूर्वक रोगराईला निमंत्रण देऊन शहरवासीयांच्या आरोग्य व्यवस्थेशी जिवघेणा खेळ करीत आहे की काय ? असा गंभीर प्रश्न एखाद्या शेषनागा प्रमाणे फना काढून उभा टाकल्याचे पाहावयास मिळत आहे.


पुर्णा शहरातील कचरा व्यवस्थापणाचे कोट्यावधीचे टेंडर जि.एम.कन्स्ट्रक्शन या संस्थेला देण्यात आले असून या संस्थेची लाखो रुपयांचे बिल देखील अदा करण्यात आलेली आहेत तरी देखील शहरातील स्वच्छता व्यवस्था जैसे थेच असल्याचे दिसत आहे पुर्णा शहरातील घनकचरा व्यवस्थापन व साफसफाईचे टेंन्डर घेतलेल्या जि.एम.कंन्स्ट्रक्शन या संस्थेकडे मनूष्यबळासह कचरा वाहतुकीसाठी मुबलक प्रमाणात वाहनांसह इतर साहीत्य देखील नसल्यामुळे शहरातील स्वच्छतेचे अक्षरशः तिनतेरा झाल्याने संबंधित संस्था घनकचरा व्यवस्थापणाची कामे न करताच बोगस बिले उचलत असल्यामुळे जि.एम.कन्स्ट्रक्शन या संस्थेचा काळ्या यादीत समावेश करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अधिराज्य प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेकडून प्रभारी  मुख्याधिकारी श्री.कदम यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या