🌟परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील बौध्द वस्तीवर जातियवादी प्रवृत्तीने केला लाठ्या काठ्याने हल्ला....!


🌟घटनेतील आरोपींवर कलम ३०७,३५४,१२० (ब) ३४ भादवीसह ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी🌟 


परभणी (दि.०८ मार्च) - तालुक्यातील बोरी प्रबुद्धनगर बौध्द वस्तीवर जातियवादी प्रवृत्तीने लाठ्या काठ्याने हल्ला केला आहे. यात महीला तरुण गंभीर जखमी झालेले आहेत या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेनेने तिव्र शब्दात निषेध केला असून मराठवाडा संपर्क प्रमुख वैभव गायकवाड यांनी असा म्हटले आहे की बोरीतील मनुवादी पक्षाचा एक गावगुंड या भयंकर घटने मागचा सूत्रधार असल्यामुळे कटाचा सुत्रधार म्हणून त्याच्यासह घटनेतील हल्लेखोरांवर कठोर करण्यात यावी.


बोरी येथील बौध्द वसाहत असलेल्या प्रबुद्धनगरात काल मंगळवार दि.०७ मार्च २०२३ रोजी अचानक वस्तीत घुसून महिला,मुली, तरुणावर झुंडीने हल्ला झाला. या घटनेतील अनेक जन गंभीर जखमी झाले परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक रागसुधा आर.यांनी यात गांभीर्याने लक्ष घालावे. बौध्द तरुणांना यंत्रणेने दमदाटी करू नये. तात्काळ सर्व आरोपींना अटक करावी व त्यांच्यावर कलम ३०७,३५४,१२० (ब) ३४ भादवीसह ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्या अंतर्गत करावी असेही वैभव गायकवाड यांनी म्हटले आहे.....

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या