🌟परभणी जिल्ह्यातील दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांनी वाढीव क्रिडा गुणांसाठी १० एप्रिलपर्यंत अर्ज करावेत....!


🌟असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे🌟

परभणी (दि.०१ मार्च) : इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव क्रीडा गुणांच्या सवलतींचा लाभ क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे दरवर्षी देण्यात येतो. हा लाभ मिळण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंचे परिपूर्ण प्रस्ताव दि. १० एप्रिल २०२३ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

या प्रस्तावासोबत २५ रुपये बोर्डाच्या नावे चलन किंवा रोखीने भरले असल्याची पावती सोबत जोडणे आवश्यक आहे. हे अर्ज ऑफलाईनद्वारे स्वीकारण्यात येतील. शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये काही क्रीडा प्रकारात प्रथम पाच क्रमांकापर्यंत प्राविण्य असलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जात असले तरीही सुधारीत शासन निर्णयानुसार फक्त प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या खेळाडू विद्यार्थ्यांस क्रीडागुणाची सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी प्रस्तावित केल्यानुसार परिशिष्ट 'अ' मधील अटी पूर्ततेच्या अधीन राहून क्रीडा सवलतीचे वाढीव गुण अनुज्ञेय राहतील, असे श्री. पवार यांनी कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या