🌟जिंतूर शिवसेना तालुकाप्रमुख पदी ॲड.सुनिल बुधवंत यांची निवड....!


🌟राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते भाई एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आली निवड🌟


जिंतूर प्रतिनीधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.२८ मार्च) :  हिंदुहृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा.श्री.एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशाने, मा. आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाने तसेच परभणी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि धम्मदीप रोडे यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यासाठी तालुकाप्रमुख पदी ॲड.सुनिल शिवाजी बुधवंत,तालुका संघटक पदी अंकुश सिताराम राठोड, महिला तालुकाप्रमुख पदी सौ. अक्षता राजेश चक्कर पाटील तर युवा शहराध्यक्षपदी गजानन ज्ञानदेव गीते यांची नियुक्ती करण्यात आली. ठाणे येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या नियुक्ती पत्रावर शिवसेना सचिव  संजय भाऊराव मोरे यांची सही असून नियुक्ती बद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने सोबत घेऊन जिंतूर कार्यक्षेत्रात पक्ष वाढीसाठी 'गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक' ही मोहीम आखत काम करणार असल्याचे ॲड. सुनिल बुधवंत व इतर पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.याप्रसंगी राजेश तातेराव चक्कर पाटील, यादवराव थिटे, संदीप खंडेराव आघाव, प्रल्हाद ज्ञानदेव गीते, अक्षय माणिकराव जायभाये, योगेश जगन्नाथ राठोड, कार्तिक यादवराव थिटे, अशोक मधुकरराव देशमुख, छञपती मथुरा राठोड, बापूराव आश्रोबा चौरे, राजाभाऊ शिंदे, डॉ. गजानन गाडेकर यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या