🌟स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी महिलांनी आपल्या दैनंदिन आहारामध्ये भरडधान्य मूल्यवर्धित उद्योग सुरु करावे....!


🌟परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे प्रतिपादन🌟 

परभणी (दि.२२ मार्च)- स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी महिलांनी आपल्या दैनंदिन आहारामध्ये भरडधान्याचा वापर करावा. तसेच त्यापासुन महिलांनी भरडधान्य मूल्यवर्धित लघु उद्योग सुरु करावेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले

वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषि विद्यापीठातील अ.भा. समन्वित कृषि क्षेत्रात पशु शक्तिचा वापर योजने अंतर्गत भरडधान्य कृषि यांत्रिकीकरण व मूल्यवर्धन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी गोयल बोलत होत्या.अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. इंद्र मणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपआयुक्त मनपा राठोड, संशोधन संचालक दत्तप्रसाद वासकर, दिपाराणी देवतराज, प्रशिक्षणाचे मार्गदर्शक म्हणून महेश लोंढे,ज्ञानेश्वर मोहिते, अश्विनी कुलकर्णी,डॉ. उदय खोडके आदिंची उपस्थिती होती. याप्रसंगी कुलगुरु डॉ. इंद्र मणि म्हणाले की, भरड धान्य मनुष्याकरीता विशेष करुण महिलांच्या आरोग्यासाठि अत्यंत उपयुक्त असून भरडधान्याचे लागवड क्षेत्र वाढविने गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. स्मिता सोलंकी प्रास्ताविकातुन महिला गृहउद्योग व बचत गटासाठि विविध यंत्राचे आणि कृषि यांत्रिकीकरनाचे प्रात्यक्षिक करुण दाखवत मार्गदर्शन केले. पाच दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमात महेश लोंढे, ज्ञानेश्वर मोहिते, अश्विनी कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणस्थळी भाजीपाला गु्रपचे शेतकरी पंडित थोरात, जनार्धन आवरगंड, रामेश्वर साबळे, प्रकाश हारकळ यांनी भरडधान्य पदार्थाचे स्टॉलसह इतर १५ ते २० स्टॉल लावले होते. प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून मंडळ कृषि अधिकारी कैलास गायकवाड, मनपा एन.यू.एल.एम. टीमचे सुभाष  मस्के, वाय. आर.पठाण, एम.आय. शेख, अर्जुन झटे, रेखा तपसे, अशा सोनवणे, कुशावर्ता जंगले, गोविंद कपाटे, अर्चना वाघमारे यांनी काम पाहिले. सूत्रसंचलन डॉ. संदेश देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी अजय वाघमारे, दीपक यंदे, रूपेश काकडे, सरस्वती पवार, प्रियंका, विशाल काळबांडे आदीनंी परिश्रम घेतले. प्रशिक्षणात २०० पेक्षा जास्त महिलांचा सहभाग घेतला होता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या