🌟राज्यातील नायब तहसीलदारांचा कामबंद आंदोलनाचा इशारा....!


🌟नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाराचा ग्रेड पे लागू करण्याची मागणी🌟 

परभणी(दि.31 मार्च) : नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाराचा ग्रेड पे लागू करावा, या मागणीसाठी सोमवार दि. 03 एप्रिलपासून तहसीलदार व नायब तहसीलदार बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत.

          नायब तहसीलदार हे पद राजपत्रिक अधिकारी वर्ग-2 मध्ये समाविष्ट आहे. परंतु, या वर्गातील अधिकार्‍यांना वेतन मात्र वर्ग-3 प्रमाणेच दिले जाते. वर्ग-2 चा ग्रेड पे 4 हजार 800 रुपये असूनसुध्दा नायब तहसीलदारांना 4 हजार 300 एवढ्या ग्रेड पे वर काम करावे लागत आहे. या संदर्भात नायब तहसीलदार संघटनेने शासन दरबारी वारंवार तक्रारी दाखल केल्या, निवेदने दिली, पाठपुरावा केला. परंतु, आश्‍वासनांपलिकडे काहीही मिळाले नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे मत या संघटनेने व्यक्त केले असून शुक्रवारी नायब तहसीलदार ओमप्रकाश गोंड, प्रशांत वाकोडकर, लक्ष्मीकांत खळीकर, एम.आर. तमभा, अनिल घनसावंत, सुरेखा पटवे आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडजकर यांना निवेदन सादर केले. त्याद्वारे, आंदोलनाचा इशारा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या