🌟देशातून आम्ही मोदी सारखा पंतप्रधान काढून फेकू - आ.बाबाजानी दुर्रानी


🌟पुर्णेत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आयोजित नागरी सत्कार व पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलतांना आ.दुर्रानी म्हणाले🌟


पुर्णा (दि.२० मार्च) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या पुर्णा शहरात काल शनिवार दि.१९ मार्च २०२३ रोजी शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात ०७-३० वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्रानी यांच्या नागरी सत्कार सोहळ्यासह सलिम सौदागर मित्र मंडळाच्या वतीने पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत झालेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर या सत्कार व पक्ष प्रवेश सोहळ्याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष वेधले होते कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक दिग्गज नेते तथा माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक हाजी कुरेशी यांनी नुकताच शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश केल्यामुळे या पक्षफुटीवर जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्रानी काय बोलतात याकडे प्रसिध्दी माध्यमांसह जनसामान्यांचे देखील लक्ष लागले होते यावर बोलतांना आ.दुर्रानी म्हणाले की हाजी कुरेशी यांना जर विचारले की स्वर्गात जाणार की नरखात ते अगोदर विचारतील की दोन पैसे फायदा कुठे आहे नरखात जर दोन पैसे मिळत असेल तर फायद्यासाठी नरखात देखील जाण्याची त्यांची तयारी आहे अश्या लोकांवर विश्वास करु नका असेही ते म्हणाले.

शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य नागरिक सत्कार व पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे आयोजन सलीम सौदागर मित्र मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख सत्कारमुर्ती म्हणून विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.आ.विजय गव्हाणे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक जाकीर कुरेशी,माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबरराव कऱ्हाळे,शिवाजीराव सवराते माजी नगरसेवक मेहबूब साहब कुरेशी,माजी शहराध्यक्ष अखिल अहेमद,ॲड.अमोल पळसकर,मा.नगरसेवक मधुकर गायकवाड मा.नगरसेवक चांद बागवान अमोल पळसकर अजय गायकवाड शेरखान पठाण उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्यावेळी बोलतांना आ.बाबाजानी दुर्राणी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार निशाणा साधला महागाई प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही मागील चार/पाच दिवसापासून अवकाळी पाऊस गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास गेला असल्याने शासनाने अवकाळी पाऊस गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून  तात्काळ मदत जाहीर करावी जुनी पेन्शन साठी कर्मचारी संपावर आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे असे ते म्हणाले केंद्र सरकार दोन समाजात अत्यंत चतुराईने फुट पाडत असुन आम्ही देशातून मोदी सारखा पंतप्रधान काढून फेकू असेही ते म्हणाले.

 या कार्यक्रमाचे आयोजन सलीम सौदागर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला होता त्यावेळी सलीम सौदागर,अजय गायकवाड अजीम कुरेशी रफिक कुरेशी अविनाश गायकवाड शंकर गवळी अजय गायकवाड कय्युम पठाण अभिषेक पिंपरणे सद्दाम कुरेशी कैफ कुरेशी अतिक कुरेशी नजीर एटीएम शफिक कुरेशी माझी पठाण सय्यद मुजीब गौरव गायकवाड फिरोज बागवान अतिश गायकवाड साहबदा पठाण व सलीम सौदागर मित्र मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आ बाबाजानी दुर्राणी  यांच्या  यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या