🌟फाल्गुन पौर्णिमेनिमित्त बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना धम्मदेशना व सत्कार समारंभ संपन्न......!


🌟यावेळी भिकू संघ महिला मंडळ व सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते🌟


पुर्णा (दि.०८ मार्च) - पुर्णा शहरामध्ये दि.०६ मार्च २०२३ रोजी फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधून सकाळी ०५-३० वाजता बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी परित्राण पाठ व सूत्रपाठ घेण्यात आला. साडेनऊ वाजता नांदेड रोडवरील तक्षशिला मागास वर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था नाम फलकाचे अनावरण व पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम सोमेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन बी राजभोज व आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.


यावेळी भिकू संघ महिला मंडळ व सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.दुपारी साडेबारा वाजता बुद्ध विहारांमध्ये धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.या वेळी प्राध्यापक डॉ. सत्यपाल महाथे रो भिक्कूनी   संघमित्रा भदंत पयारत्न भदंत शील रत्न भदंत पयावांश भदंत संघरत्न यांची उप स्थिती होती  या वेळी भदंत भदंत डॉ. उप गुप्त महाथेरो श्रीलंका येथील भिक्षूनी संघमित्रा यांची धम्म देशना झाली.


धम्मदेशनेमध्ये धम्म देश ने मध्ये डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी शील सदाचाराचे महत्व विशद केले भिक्षुनी संघमित्रा यांनी भारतामधून श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्म कसा गेला सम्राट अशोक  यांनी त्यांचे मुलगा आणि मुलगी यांना धम्माच्या प्रचार प्रसारासाठी श्रीलंका या ठिकाणी पाठवले संघमित्रा मित्रा ह्या भिक्षुणी बनून श्रीलंका या देशामध्ये  धम्माच्या प्रचार प्रसाराचं कार्य केले. भिक्षूनी संघमित्रा  यांच्या त्याग सेवा समर्पणातून श्रीलंका या ठिकाणी शुद्ध स्वरूपामध्ये धम्म रुजला प्रचार व प्रसार झाला त्यांनी आपली धम्मदेशना सी हल भाषेमधून दिली भाषांतर पय्यारत्न महाथेरो यांनी केले यावेळी सिद्धार्थ हत्ती आंबेरे यांचा भावपूर्ण सत्कार बुद्ध विहार समितीच्या वतीने करण्यात आला त्यांच्या प्रमुख संयोजना खाली  परभणी ते चैत्यभूमी मुंबई थायलंड येथील एकशे दहा भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये ही पदयात्रा पार पडली.

या पदयात्रेमुळे महाराष्ट्रामध्ये बुद्ध धम्म धम्ममय वातावरण निर्माण झाले त्यांच्या या कार्याबद्दल शाल पुष्पहार स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्याच प्रमाणे लातूर येथील सेवानिवृत्त वनाधिकारी जी एस साबळे डॉक्टर बाबासाहेब  आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त केशव कांबळे कंधार चे माजी नगराध्यक्ष रामराव पवार  दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर राहुल सिंग लातूर येथील सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी पांडुरंग अंबुल गेकर यांचा सत्कार करण्यात आला धम्मदेशना व सत्कार समारंभ नंतर बुद्ध विहारामधून थायलंड येथून आणलेल्या बुद्ध मूर्तीची भव्य मिरवणूक वाद्य वृंदा सह भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने श्रद्धा संपन्न उपासक उपा सीका सहभागी झाले होते.

भीम नगर या ठिकाणी स्मृतीशेष भैय्यासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहामध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी आपल्या धम्मदेशनेमध्ये बुद्ध धम्म विनया प्रमाणे आचरण केल्यास मानवाची सर्वांगीण प्रगती होते  ,प्रा.डॉ.सत्यपाल महा थेरो यांनी मंगल मैत्रेय भावनेची मह ती विशद करताना सांगितले धम्मा मधील मंगल मैत्रीची भावना सर्वश्रेष्ठ आहे   माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे  प्रज्ञा अजय गायकवाड यांचे समायोचीत भाषण झाले नगरसेवक मधुकर गायकवाड व कुटुंबीयांच्या वतीने भिकू संघाला ची वरदान व फलदान देण्यात आले शाहीर विजय सातोरे यांचे स्वागत गीत व प्रबोधन गीताचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे नगरपालिकेचे गट नेते उत्तम भैया खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड शामराव जोगदंड यादवराव भवरे अशोक धबाले विजय बगाटे दिलीप गायकवाड पी.जी  रणवीर मुकुंद पाटील अमृत मोरे टी झेड कांबळे शिवाजी थोरात मुगाजी खंदारे ज्ञानोबा जोंधळे मिलिंद कांबळे साहेबराव सोनवणे  आदींची उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतुल गवळी उमेश बाराटे राम भालेराव सूरज जोंधळे व महिला मंडळांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या