🌟उत्तर प्रदेशातील लस्सी/आईस्क्रीम/जुस विक्रेत्यांनी मराठी मानसांना लावले लस्सीचे वेड.....!


🌟🌟पुर्णेत सन १९८५/८६ पासून थाटतात 'जय शंकर कोल्ड्रीक अँड लस्सी आईस्क्रीम हाऊसच्या नावाने दही/दुधापासून बनणाऱ्या शितपेयांची दुकान🌟


🌟देशी लस्सीमुळे घातक केमीकलयुक्त कोल्ड ड्रिंकचा नागरिकांना पडला विसर🌟 


✍🏻शोध आणि बोध : चौधरी दिनेश (रणजीत)

उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली की उत्तर प्रदेशातील लस्सी/आईस्क्रीम/जुस विक्रेत्यांची पाऊल जशी महाराष्ट्राच्या दिशेने वळू लागतात त्याच प्रमाणे फेब्रुवारी/मार्च महिण्यात कडक उन्हाळा लागताच शितपेयांच्या शोधात निघणाऱ्या लोकांची पाऊल देखील आपोआपच लस्सी/आईस्क्रीम/ज्युस सेंटरकडे वळायला सुरुवात होते शेकडो किलोमीटरचे अंतरपार करुन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरात परराज्यातून उत्तर प्रदेश/राजस्थान मधून महाराष्ट्रात रोजीरोटीच्या शोधात आलेले युपीतील भैया अन् राजस्थानातील महाराज आपआपली दही/दुधापासून बनवलेली चवदार शितपेयांची दुकान/हातगाडे जागोजाग थाटतात....या शितपेयांमध्ये मानवी आरोग्यास उपायकारक दुध/दही आदीपासून बनवलेली लस्सी/फळांचे ज्युस/आईस्क्रीम/कुल्फी/कसाटा/बादामसेक आदींचा समावेश असतो.


उत्तर प्रदेशातील फरुखाबाद,कन्होज,कानपूर जिल्ह्यातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शहरांसह गावपातळीवर आपआपली देशी बनावटीच्या शितपेयांची दुकान थाटलेल्या या उत्तर प्रदेशातील भैयांच्या स्वाभावातील प्रेमळपणा स्थानिक लोकांमधौये आआपुलकी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो आलेल्या प्रत्येक ग्राहकाला अत्यंत आदराने बोलून त्यांचे समाधान कसे करावे या त्यांच्या सद्गुनांचा प्रत्येक व्यक्तीने अंगीकार केल्यास निश्चितच एकमेकांच्या मनात एकमेकां विषयी असलेला द्वेष/मच्छर आपोआपच संपुष्टात येईल असे म्हणण्यास हरकत नाही.


महाराष्ट्रातील जनतेला स्वदेशी दही/दुधापासून बनवलेल्या देशी बनावटीच्या शितपेयांची सवय जर कोणी लावली असेल तार या उत्तर प्रदेशातील भैयांनीच असे म्हणने चुकीचे ठरणार नाही विदेशी बॉटलबंद शितपेय (कोल्ड ड्रिक) यात थंम्सअप,स्पारिट,कोकोकोला,स्टिंग,फंन्टा,मिरींडा,कैपा कोला,माझा,सेवनअप,लिमका,माऊंटेन ड्यू या केमीकल/रसायनयुक्त शितपेयांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो हे आरोग्यतज्ञांनी वेळोवेळी सिध्द काले आहे या शितपेयांचे सातत्याने सेवन केल्यामुळे मनुष्याचे वजन झपाट्याने वाढण्यास सुरुवात होते कारण यात साखरेचे देखील प्रमाण जास्त असते साखरेच्या सेवनामुळे वजन वाढण्यापासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात एक ग्लास कोल्ड्रिंकमध्ये अंदाजे आठ ते दहा चमचे साखर असते. त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक्स पिऊन तुम्ही तुमच्या आहारात साखर घालता, जी आमच्या आरोग्यासाठी कोणत्याही प्रकारे चांगली नसते एक ग्लास कोल्ड ड्रिंकमध्ये सुमारे १५० कॅलरीज असतात. दररोज इतक्या कॅलरीजचे सेवन केल्याने तुमचे वजन वाढते आणि आरोग्याशी संबंधित समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण होतात त्यामुळे बॉटलबंद शितपेयांचे सेवन करणे होईन तोपर्यंत टाळलेलेच बरे...


🌟दही/दुधापासून बनलेल्या लस्सीमुळे/ज्युस/आईस्क्रीम/कसाटा आदी देशी बनावटीच्या शितपेयांमुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते :-

बीबॉडीवाइजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, काही लोक उन्हाळ्यात तहान शमवण्यासाठी कार्बोनेटेड पेये,कोल्ड ड्रिंक्स, शर्करायुक्त सोडा इत्यादी पितात, ज्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते.त्यामुळे पोटदुखी,स्मृतिभ्रंश,पोटाची चरबी, यकृतातील चरबी,मेटाबॉलिक सिंड्रोम इत्यादी समस्या वाढवतात नैसर्गिक पेय किंवा सेंद्रिय पेय म्हणून लस्सी पिणे चांगले. सोडा आणि साखरयुक्त पेयांपेक्षा लस्सी हा आरोग्यदायी पर्याय आहे. लस्सी गोड असते,जी दह्यापासून तयार केली जाते. लस्सीमध्ये विविध प्रकारचे पोषक आणि चांगले बॅक्टेरिया असतात, पोटाचे खराब आरोग्य बरे करून एकूण आतड्याचे आरोग्य सुधारते.

🌟परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांसह पुर्णेतही उत्तर प्रदेशातील भैयांनी थाटली लस्सीची दुकान :-


उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिण्यात उत्तर प्रदेशातील भैयांची पाऊल पुर्णा शहराकडे वळू लागतात मागील सदोतीस/अडोतीस वर्षापुर्वी सन १९८५/८६ यावर्षी उत्तर प्रदेशातील कन्होज मियागंज येथील चंद्रप्रकाश कुशवाह ठाकूर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जय शंकर लस्सी/आईस्क्रीम अँड कोल्ड्रींक हाऊस या नावाने लस्सीच्या दुकानाला सुरुवात केली होती मागील सदोतीस/अडोतीस वर्षापासून कुशवाह ठाकूर बंधू सातत्याने प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात शहरात लस्सीचे दुकान थाटतात त्यामुळे पुर्णेकरांशी त्यांचे एकप्रकारे आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.

प्रथमतः काही वर्ष जय शंकर लस्सी/आईस्क्रीम अँड कोल्ड्रीक हाऊस या नावाने लस्सीचे एकच दुकान होते परंतु मागील काही वर्षापासुन लस्सीच्या दुकानांमध्ये वाढ होत होत यावर्षी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परासरात जय शंकर लस्सी/आईस्क्रीम अँड कोल्ड्रींक्स हाऊस या नावाने चंद्रप्रकाश कुशवाह ठाकूर राहणार मु.पी.मियागंज जिल्हा कन्होज उत्तर प्रदेश,ठाकूर सोबरणसिंह राहणार मु.पो.दरोरा जिल्हा फरुखाबाद उत्तर प्रदेश,मनोजकुमार ठाकूर राहणार मु.पो.बडागाव जिल्हा कन्होज यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात याच जय शंकर लस्सी/आईस्क्रीम अँड कोल्ड्रींक हाऊस या नावाने कमल ठाकूर राहणार मु.पो.मियागंज जिल्हा कन्होज उत्तर प्रदेश व जय शंकर लस्सी/आईस्क्रीम अँड कोल्ड्रींक हाऊस या एकाच नावाने विमल ठाकूर राहणार मियागंज जिल्हा कन्होज उत्तर प्रदेश या ठाकूर बंधूंनी लस्सीची दुकान थाटली असून शहराबाहेरील पुर्णा-नांदेड मार्गावरी झिरो टि पॉईंट परिसरात जय शंकर लस्सी/आईस्क्रीम अँड कोल्ड्रींक हाऊस या नावाने रामकिशोर ठाकूर राहणार मु.पी.बडागाव जिल्हा कन्होज उत्तर प्रदेश यांनी लस्सीचे दुकान थाटले आहे शहरात आज एकून सहा लस्सी/ज्युस या देशी शितपेयांची दुकान थाटण्यात आली असल्यामुळे शितपेयांच्या शोकीनांचा ओढा आता मोठ्या प्रमाणात या देशी बनावटीच्या शितपेयांकडे वळू लागल्यामुळे विदेशी बॉटलबंद शितपेयांवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे....

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या